Kunal Kamra ला कंगना रणौत यांनी सुनावले; म्हणाले…

आपला समाज कुठे चाललाय? फक्त २ मिनिटांच्या प्रसिद्धीसाठी हे असे करत आहेत. तर आपला समाज कुठे चालला आहे? आपण याचा विचार करायला हवा, असेही खासदार रणौत म्हणाल्या.

71

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने (Kunal Kamra) व्यंगात्मक काव्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. यामुळे राज्याचे राजकारण पेटलेले आहे. शिवसेना शिंदे गट कामरावर तुटून पडला आहे. शिवसैनिकांनी निषेध म्हणून कुणाल कामराचा शो झाला, त्या हॉटेलमध्ये घुसून सेटची तोडफोड केली. आता या प्रकरणी खासदार कंगना रणौत यांनी कामराला सुनावले.

“तुम्ही कुणीही असा… तुम्ही एखाद्याशी सहमत असाल किंवा नसाल. पण त्याने (कुणाल कामरा) ज्याप्रकारे माझी टिंगळ उडवली होती. माझ्याबरोबर जे काही अनधिकृतपणे झाले होते. त्याची मस्करी त्याने केली होती. मी माझ्या घटनेचा आणि या घटनेचा संबंध जोडत नाही. तुम्ही कुणीही असाल. पण कुणाचा अपमान करणे हे योग्य नाही. एखाद्या व्यक्तीसाठी आदरच सर्वस्व असतो. तुम्ही विनोदाच्या नावाखाली अपमान करत आहात. त्यांच्या कामाचा अपमान करत आहेत. शिंदेजी एकेकाळी रिक्षा चालवत होते. आज ते स्वतःच्या हिंमतीने पुढे आले आहेत. स्वतःची काय पात्रता आहे? हे लोक कोण आहेत? जे आयुष्यात काहीच करू शकले नाहीत. ते जर लिहित असतील तर त्यांनी साहित्यात काहीतरी लिखाण करावे किंवा चित्रपटांसाठी विनोदी लिखाण करावे. (Kunal Kamra)

(हेही वाचा Kunal Kamra आतापर्यंत अडकला ‘या’ मोठ्या वादांमध्ये)

कॉमेडीच्या नावाखाली शिवीगाळ करणे, आपल्या धर्मग्रंथांची खिल्ली उडवणे, लोकांची खिल्ली उडवणे, माता-भगिनींची खिल्ली उडवणे हे आजकाल हे लोक स्वतःला इन्फ्लुएन्सर म्हणत आहेत. तर मला विचारायचे आहे की, आपला समाज कुठे चाललाय? फक्त २ मिनिटांच्या प्रसिद्धीसाठी हे असे करत आहेत. तर आपला समाज कुठे चालला आहे? आपण याचा विचार करायला हवा, असेही खासदार रणौत म्हणाल्या. (Kunal Kamra)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.