नितेश राणे कुठे आहेत? कणकवली पोलिसांची नारायण राणेंना नोटीस

70

संतोष परब यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी सध्या अडचणीत सापडलेले आमदार नितेश राणे सध्या गायब आहे. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मात्र आता कणकवली पोलिसांनी थेट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस बजावली असून, नितेश राणे कुठे आहेत, अशी विचारणा करण्यात आली आहे. कारण मंत्री राणे यांना काल झालेल्या पत्रकार परिषदेत नितेश राणे कुठे आहेत, असा सवाल विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी हे सांगायला आम्ही मूर्ख आहोत का, असे उत्तर दिले होते.

नेमके प्रकरण काय?

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असलेल्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांना अटकेचा वॉरंट निघाला आहे. नितेश राणे यांना अटक यांना करण्यात यावी, याकरिता शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी सकाळी कणकवली पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला होता. तर दुसऱ्या बाजूला सभागृहात शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनीही नितेश राणे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यानंतर कणकवली पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, नितेश राणे सध्या अज्ञातवासात गेले आहेत. आमदार नाईक यांनी कणकवली पोलिसांना पत्र देऊन नितेश राणेंना अटक करण्याची मागणी केली.

(हेही वाचा राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा परत पाठवला)

एक खरचटलं… मारहाण झाली मग एवढे पोलिस का?

नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवल्यानंतर शिवसेना अधिकच आक्रमक झाली असून, त्यामुळेच नितेश राणेंना एका प्रकरणात अटक करण्यासाठी संपूर्ण पोलिस यंत्रणा कामाला लावल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांच्या अटकेसाठी पोलिस सिंधुदुर्गात ठिकठिकाणी शोध घेत आहेत. यावर बोलताना नारायण राणे म्हणाले, पोलिस एवढे का आले, याची माहिती घ्या. काय टेररिस्ट आले की पाकिस्तानातून कोणी आलं? एक खरचटलं… मारहाण झाली मग एवढे पोलिस का? अशा घटना घडत असतात, असेही राणे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.