Kanwar Yatra Order : दुकानांवर मालकाचे नाव लिहिण्याच्या आदेशाचे Ramdev Baba यांच्याकडून समर्थन, म्हणाले…

183

योगी सरकारने उत्तर प्रदेशात कावड यात्रेच्या (Kanwar Yatra Order) मार्गावरील जे दुकाने आणि विक्रेते असतील त्यांनी मालकाचे नाव लिहावे, असा आदेश काढला. त्यानंतर या निर्णयावर टीका होऊ लागली आहे. मात्र योगगुरू रामदेव बाबा (Ramdev Baba) यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे. जर रामदेवला आपली ओळख जाहीर करण्यात काही अडचण वाटत नाही, मग रेहमानला काय अडचण आहे?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

काय म्हणाले रामदेव बाबा? 

“मला माझी रामदेव ही ओळख उघड करण्यात कोणतीही अडचण वाटत नाही, मग रहमानला काय अडचण वाटत असावी? प्रत्येकाला त्याच्या नावाचा अभिमान वाटला पाहिजे. नाव लपविण्याची कोणतीही गरज नाही, तुम्ही तुमचे काम मनापासून करणे जास्त महत्त्वाचे आहे. जर आपले काम आपण अतिशय चांगल्या पद्धतीने करत असू तर मग हिंदू असो किंवा मुस्लीम किंवा इतर धर्माचे असो, त्याने काहीही फरक पडत नाही, असे रामदेव बाबा  (Ramdev Baba) म्हणाले.

(हेही वाचा Mumbai Heavy Rain : मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग; सखल भाग पाण्याखाली; नागरिकांना सतर्कतेचा इशारा)

उत्तराखंड, उज्जैनमध्येही आदेश 

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड नंतर उज्जैन महानगरपालिकेनेही असाच एक निर्णय घेतला आहे. दुकानदारांनी त्यांचे खरे नाव दुकानावर जाहीर करावे, असे आदेश देण्यात आले आहेत. उज्जैन मनपाचे महापौर मुकेश टटवाल शनिवारी म्हणाले, जे या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांना २,००० रुपयांचा दंड भरावा लागेल. जर त्याच दुकानदाराने पुन्हा गुन्हा केल्यास त्याला ५,००० रुपयांचा दंड भरावा लागेल. उज्जैन हे धार्मिक शहर आहे. लोक येथे आस्था घेऊन येतात. त्यामुळे त्यांना दुकानाचा मालक कोण आहे? हे जाणून घेण्याचा पूर्ण हक्क आहे. त्यांच्या आस्थेचा प्रश्न आहे. ग्राहकांची दिशाभूल किंवा फसवणूक होऊ नये, यासाठी हा निर्णय योग्य आहे, असेही महापौर मुकेश टटवाल म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.