सध्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षामध्ये सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाचे मजबूत बाजू मांडणारे कपिल सिब्बल आता देशाच्या राजकारणात स्वतःचा वेगळा ठसा उमटवण्याच्या विचारात आहेत. त्यासाठी त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते भाजपच्या विरोधात आघाडी उभारण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी ते सर्व विरोधी पक्षांना निमंत्रित केले आहे. कपिल सिब्बल हे त्याचे यादीतील नेते आहेत जे काँग्रेसच्या नेतृत्वाच्या विरोधात बंड करणाऱ्या नेत्यांमध्ये होते. त्यांनी गेल्याच वर्षी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर समाजवादी पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवले.
२०१४ आणि २०१९ मध्ये नरेंद्र मोदी यांचा प्रभाव देशाच्या राजकारणात इतका होता की त्यासमोर देशभरातील राजकीय पक्ष टिकू शकले नाहीत. २०१९ मध्ये तर काँग्रेस नामोहरम झाली आहे म्हणून काँग्रेसव्यतिरिक्त अन्य सर्व विरोधी पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांनी केला होता, मात्र त्या निवडणुकीत मोदींना २०१४ पेक्षा अधिक जागा मिळाल्या होत्या. आता २०२४ मध्येही पुन्हा असाच प्रयत्न करण्याचा विचार सुरु होत असताना आता कपिल सिब्बल यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. विरोधकांनी मला साथ द्यावी. आपण भाजप विरोधात भक्कम आघाडी उभी करू, असे आवाहन कपिल सिब्बल यांनी केले आहे. कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व विरोधकांना एका मंचावर येण्याचे आवाहन केले आहे.
(हेही वाचा रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! तब्बल २५० रेल्वे केल्या रद्द)
जंतरमंतरवर कार्यक्रम होईल
आता लोकांना जागृत करण्याची वेळ आली आहे. अन्यायाच्या विरोधात आता लढण्याची गरज आहे. देशातील विरोधी पक्षांचे मुख्यमंत्री, नेत्यांनी मला साथ द्यावी. आपण एक राष्ट्रीय मोहीम सुरू करू. गुलामी संपुष्टात यावी यासाठी ही चळवळ असेल. येत्या 11 मार्च रोजी नवी दिल्लीच्या जंतरमंतरवर मोठा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाला देशातील सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना आमंत्रित केले जाईल, असे कपिल सिब्बल यांनी सांगितले. सरकार विरोधात आवाज उठवला तर कारवाई होते. सरकार विरोधात बोलणाऱ्यांना तुरुंगात टाकलं जात आहे. देश संविधानावर न चालता धर्मावर चालला आहे. त्यामुळेच आता जनतेला जागृत करणअयाची गरज आहे, असेही सिब्बल म्हणाले.
Join Our WhatsApp Community