महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सलग तिसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सरन्यायाधीश धनजंय चंद्रचूड यांच्यासह न्यायमूर्ती एम. आर. शाह, कृष्णा मुरारी, हिमा कोहली, पी. नरसिंह या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. मंगळपासून जवळपास अडीच दिवस ठाकरे गटाकडून वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद आला. आता सध्या ठाकरे गटाकडून वकिल अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करत आहेत. पण अडीच दिवसांच्या कपिल सिब्बलांच्या जोरदार युक्तिवादानंतर न्यायालयात भावनिक शेवट पाहायला मिळाला.
युक्तिवादाच्या शेवटी काय म्हणाले सिब्बल?
‘ही केस जिंकेन किंवा हरेन यासाठी केवळ मी इथे उभा नाही. पण, ज्या गोष्टी आपल्या हृदयाच्या अगदी जवळ आहेत, अशा घटनात्मक नैतिकता टिकून राहावी, याची खात्री करण्यासाठी मी येथे उभा आहे. बंडखोर आमदार पात्र ठरले तर १९५०च्या दशकापासून देशात जे कायम ठेवले, त्याचा मृत्यू होईल,’ असे म्हणत कपिल सिब्बलांनी युक्तिवादाचा भावनिक शेवट केला.
Sibal: If this kind of manipulation in the process of institutional decision making, I don't know where we'll go.#ShivSenaCrisis #UddhavThackeray #EknathShinde #SupremeCourtOfIndia
— Live Law (@LiveLawIndia) February 23, 2023
सिब्बलांच्या युक्तिवादातील महत्त्वाचे मुद्दे
- शिंदेंच्या सरकार स्थापनेत राज्यपालांची भूमिका संशयास्पद.
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी मुद्दाम मविआचे सरकार पाडले.
- शिवसेनेचे आमदारच शिवसेनेचे सरकार कसे पाडू शकतात? तसेच ते अविश्वास प्रस्ताव कसे आणू शकतात?
- राज्यपालांनी अधिकाराचा गैरवापर करत शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. आता जर राज्यपालांनी दिलेला शपथविधी चुकीचा ठरला तर शिंदेंचेच सरकार जाईल. कारण राज्यपालांनी अपत्रातेची आमदारावर टांगती तलवार असताना शपथ दिली कशी? पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतानाच शिंदेंना राज्यपालांनी शपथविधीसाठी कसे काय बोलावले?
(हेही वाचा – सत्तासंघर्षावर सर्वोच्च सुनावणी! एकनाथ शिंदेंच्या सत्तास्थापनेत राज्यपालांची भूमिका संशयास्पद, ठाकरे गटाचा युक्तिवाद)
Join Our WhatsApp Community