विरोधी पक्षांची (opposition party) एकजूट असलेली इंडी आघाडी (INDI Aghadi) एकसंध असली पाहिजे, असे म्हणत घरचा आहेर राज्यसभा सदस्य कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना इंडी आघाडीला (INDI Aghadi) दिला. यासोबतच सिबल यांनी विरोधकांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवू शकेल, अशा विरोधकांच्या आघाडीला वैचारिक चौकटीची गरज असल्याचेही ते म्हणाले.
( हेही वाचा : IPL 2025, SRH vs RR : राजस्थानच्या जोफ्रा आर्चरची आयपीएलमधील सर्वात महागडी गोलंदाजी)
दरम्यान इंडी आघाडीतील (INDI Aghadi) सहभागी पक्षांना मतभेद विसरून, भविष्यात सुसंगत धोरण, वैचारिक चौकट आणि कार्यक्रम आखण्याची गरज आहे, असेबी सिब्बल (Kapil Sibal) म्हणाले. त्याचवेळी देशातील निवडणूक आयोग (Election Commission) अकार्यक्षम आणि अयशस्वी संस्था असल्याची टीका त्यांनी केली.
राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचार करण्याच्या पद्धतीत एकसमानता असली पाहिजे आणि जोपर्यंत आघाडीकडे आपले विचार मांडणारे प्रवक्ते (Spokesperson) मिळत नाहीत तोपर्यंत ती फार प्रभावीपणे पुढे जाऊ शकत नाही, असा टोलाही एकाअर्थी इंडी आघाडीतील (INDI Aghadi) मित्रपक्षांना त्यांनी लागवला. त्यामुळे इंडी आघाडी विखरल्याची चर्चा सर्वत्र आहे. त्यात कपिल सिब्बल यांनी केलेल्या विधानाने इंडी आघाडीच्या वाईट अवस्थेला अधिकच अधोरेखित केले आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community