महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सर्वोच्च सुनावणी सध्या अंतिम टप्प्यात आहे. बुधवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर आता गुरूवारच्या सुनावणीत ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. सिब्बल यांच्या युक्तिवाद संपला असून काही काळाच्या ब्रेकनंतर ठाकरे गटाचे दुसरे वकील अभिषेक मनु सिंघवी बाजू मांडणार आहे. यावेळी कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायलयात भावनिक आवाहन करत आपल्या युक्तिवादाचा शेवट केला…
( हेही वाचा : पुढचे २४ तास महत्त्वाचे! राज्यात अवकाळी पावसाला सुरूवात, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट )
कपिल सिब्बलांच्या युक्तिवादाचा शेवट काय होता?
न्यायालयाच्या इतिहासातील हा महत्त्वाचा क्षण असून याठिकाणी लोकशाहीचे भवितव्य ठरवले जाणार आहे. मला याची खात्री आहे की, या न्यायालयाने जर मध्यस्थी केली नाही, तर आपली लोकशाही धोक्यात येईल. कोणतंच सरकार अशाप्रकारे टिकू दिले जाणार नाही. अशाप्रकारे मी माझा युक्तिवाद संपवतो असे भावनिक आवाहन करत तुम्ही राज्यपालांचे आदेश रद्द करा अशी विनंती ठाकरे गटाते ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायलयाकडे केली आहे.
#SupremeCourt #Shivsena #KapilSibal #MaharashtraPolitics #UddhavThackeray #EknathShinde pic.twitter.com/i24DBSFe4W
— Live Law (@LiveLawIndia) March 16, 2023
( हेही वाचा : Maharashtra Political Crisis Supreme Court: …म्हणून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळाले – कपिल सिब्बल )
कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातील महत्त्वाचे मुद्दे
कपिल सिब्बल शिंदे गटाच्या भूमिकेवर बोट ठेवत म्हणाले की, आधी शिंदे गट म्हणाला होता की, ते पक्षातून बाहेर पडले आहेत. नंतर ते म्हणाले की, आम्ही मूळ राजकीय पक्ष आहोत. आता म्हणतात की, आम्ही पक्षातच आहोत. अशा प्रकारे शिंदे गटाने वेगवेगळ्या भूमिका मांडल्या आहेत. एकनाथ शिंदेंना विश्वासघात केल्याचे बक्षीस म्हणूनच त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले आहे.
Join Our WhatsApp Community