कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपली असून आता मतदानाकडे लक्ष लागले आहे, अशा वेळा कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कुणाला विजय मिळेल? असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. त्यावर पवार यांना धक्कादायक विधान केले. ते साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
अजित पवार नेमके काय म्हणाले?
राष्ट्रवादी साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यांच्या टीकेला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले. देवेंद्र फडणवीस यांना आमची काळजी करण्याचे कारणच नाही. 36 जिल्ह्यांपैकी आम्ही साडेतीन जिल्ह्यांपुरते मर्यादित असू तर त्यांच्यासमोर कुणी विरोधकच नाही. कारण शिवसेनेची त्यांनी काय अवस्था केली, आम्ही तर साडेतीन जिल्ह्यातील आहोत. काँग्रेसबद्दलही असेच दावे असतात. काँग्रेस संपली पाहिजे, असे ते वक्तव्य करतात. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कुणाला विजय मिळेल? असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. आता काही सांगता येत नाही. आपण कुणीही ज्योतिषी नाही. प्रत्येकजण आपापल्या परिने सांगतंय. सुरुवातीच्या काळात काँग्रेसचं वातावरण चांगले आहे, असे मीडियात सातत्याने वाचायला मिळत होते. नंतर बजरंग दलाबद्दल भूमिका घेतल्यानंतर मग तिथे एकदम भाजपच्या मोठ्या नेत्यांना बजरंगाची मूर्ती देण्याची परंपरा सुरु झाली. भावनिक माध्यमातून निवडणुकीचे वातावरण वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करण्यात आला, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली. यावेळी सत्ताधाऱ्यांकडून आपल्या सरकारला धोका नाही, असा दावा केला जातोय. याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी प्रत्येक सरकार आपले सरकार असेपर्यंत सरकारला धोका नाही, असेच म्हणेल. आम्हाला प्रत्येक मताला उत्तर देण्याचे कारण नाही. फार महत्त्वाचे असेल तर आम्ही त्याची नोंद घेऊन उत्तर देवू. हा विषय नोंद घ्यावासा वाटत नाही, असे उत्तर दिले.
(हेही वाचा cyclone : चक्रीवादळाचा इशारा; राज्यात कोणत्या जिल्ह्यांना बसणार फटका? )
Join Our WhatsApp Community