कुमारस्वामींचा सत्ता जिहाद! म्हणाले, पुन्हा सत्ता दिल्यास…

भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे उलटली तरीही अजून अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन करण्याचे राजकारण कमी झालेले नाही, कारण कर्नाटकातील माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे वादग्रस्त विधान कारणीभूत आहे, त्यांनी कर्नाटकातील जनतेला धक्कादायक आवाहन केले आहे. जनता दल सेक्युलर पक्षाला पुन्हा सत्ता दिल्यास मुसलमानाला मुख्यमंत्री बनवू असे मत त्यांनी मांडले आहे. त्यामुळे कर्नाटकात नवा वाद उसळण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले एचडी कुमारस्वामी? 

सध्या कर्नाटक हे राज्य मुस्लिमांच्या विविध मुद्दांवर चर्चेत आले आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये मुस्लिम विद्यार्थिनींनी हिजाब घालण्याला प्रतिबंध केल्यामुळे वाद निर्माण झाला होता, त्यानंतर लव्ह जिहाद आणि वीर सावरकर यांचा अवमान या मुद्यावरही राज्यात वाद निर्माण झाला होता. राज्यातील याच वातावरणाचा राजकीय फायदा घेण्यासाठी कुमारस्वामी यांनी मुसलमानांना चुचकारण्यासाठी हे विधान केले असल्याचे बोलले जात आहे. कर्नाटकात पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणूक होणार आहेत. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पंचरत्न यात्रेचा भाग म्हणून कोलार जिल्ह्याचा दौरा करत आहेत. वसंतनरसापुरा येथे एका दलित तरुणाने मला भेटून त्याच्या समस्या सांगितल्या. यानंतर मी जाहीर केले की, माझा पक्ष सत्तेवर आल्यास उपमुख्यमंत्रीपद दलितासाठी तयार केले जाईल, असेही कुमारस्वामी म्हणाले. काँग्रेसमध्ये खूप संघर्ष केल्यानंतर जी परमेश्वर उपमुख्यमंत्री झाले आणि गोविंद करजोल यांचे नाव भाजपच्या हायकमांडला पुढे करावे लागले आणि हे दोन्ही नेते दलित समाजातून आलेले आहेत. याचबरोबर, महिला व बालकल्याण विभाग पुरेसे काम करत नसल्याचा आरोप करत महिलांच्या विकासासाठी उपमुख्यमंत्रीपदी एका महिलेची नियुक्ती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

(हेही वाचा love jihad : उत्तर प्रदेशातील ‘आफताब’नेही हिंदू युवतीचे तुकडे शेतात पुरले, पण दोन वर्षांनी असे घडले…)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here