कर्नाटक विधानसभा निवडणूक : १० मे रोजी मतदान, ‘या’ तारखेला होणार मतमोजणी

143

कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रक्रियेंतर्गत एकाच टप्प्यात १० मे रोजी मतदान होणार असून १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. यासोबतच कर्नाटकात आचारसंहिता लागू झाली आहे.

असा असेल निवडणूक कार्यक्रम 

  • उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटची तारीख – २० एप्रिल २०२३
  • उमेदवारी अर्ज छाननी तारीख – २१ एप्रिल २०२३
  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख – २४ एप्रिल २०२३
  • मतदानाची तारीख -१० मे २०२३
  • मतमोजणीची तारीख – १३ मे २०२३

मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, कर्नाटकात २०१८-१९ मध्ये पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची संख्या ९.१७ लाखांनी वाढली आहे. १ एप्रिलपर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे सर्व तरुण मतदार कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदान करू शकतील. तसेच कर्नाटक राज्यातील २२४ विधानसभा मतदारसंघात ५,२१,७३,५७९ नोंदणीकृत मतदार आहेत. राज्यभरात ५८,२८२ मतदान केंद्रे उभारली जाणार आहे.

कर्नाटक विधानसभा २४ मे रोजी विसर्जित होणार आहे. दरम्यान २०१८ मधील कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम २७ मार्च रोजी जाहीर झाला होता. यंदा आज म्हणजेच २९ मार्च रोजी तारखा जाहीर झाल्या आहेत. मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही एकाच टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे.

२०१८ च्या निवडणुकीचा निकाल

कर्नाटकमध्ये २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळााले नव्हते. भाजपने २२४ पैकी १०४ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने ८० जागा आणि जेडीएसने ३७ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसच्या आमदारांनी बंड केले आणि भाजपमध्ये सामील झाले. कर्नाटकात सध्या भाजपकडे ११९ जागा आहेत. तर काँग्रेसकडे ७५, तर मित्रपक्ष जेडीएसकडे एकूण २८ जागा आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.