लोकायुक्त पोलीस आणि कर्नाटक सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून भाजपच्या विद्यमान आमदाराच्या मुलाला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ही कारवाई करण्यात आली त्यावेळी आमदाराचा मुलगा एका खासगी कार्यालयात बसला होता. त्यानंतर त्याला 40 लाखांची लाच घेताना लोकायुक्तांकडून पकडण्यात आले आहे. याप्रकरणी भाजपचे आमदार विरुपक्षप्पा यांचा मुलगा प्रशांत मादाल याला ताब्यात घेण्यात आले आहे.
आमदार मादाल विरुपक्षप्पा हे कर्नाटकमधील सोप्स आणि डिटर्जंट्ंस लिमिटेडचे अध्यक्ष आहेत. त्यांचा मुलगा प्रशांतच्या विरोधात लाच मागितल्याप्रकरणाी एका व्यक्तीने तक्रार दाखल केली होती.
आमदाराच्या मुलाला रंगेहात पकडले
आमदाराचा मुलगा लाच घेत असल्याचा आरोप केल्यानंतर याप्रकरणी लेखी तक्रारही दाखल करण्यात आली होती. या तक्रारीमुळेच लोकायुक्तांनी सापळा रचून प्रशांतला रंगेहाथ पकडले आहे. त्यानंतर त्याला अटकही करण्यात आली . यावेळी प्रशांतकडून 40 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.
( हेही वाचा: राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांना आता दुप्पट अनुदान मिळणार )
Join Our WhatsApp Community