सीमावाद सुरु असतानाच बोम्मईंचं पुन्हा ट्विट; म्हणाले, ‘… कोणतीही तडजोड करणार नाही’

143

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा सीमावादावरुन वक्तव्य केले आहे. महाविकास आघाडीच्या खासदारांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादावर तोडगा काढू असे आश्वासनही त्यांनी दिल्याचेही या खासदारांनी सांगितले. अशातच महाविकास आघाडीच्या खासदारांनी कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे तक्रार केली आहे.

येत्या १४ डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहितीही मविआच्या खासदारांनी दिली आहे. महाराष्ट्राच्या खासदारांनी अमित शाहांची भेट घेतल्याने काहीही फरक पडणार  नाही. सीमाप्रश्नावर आमचं सरकार कोणतीही तडजोड करणार नाही, असे ट्वीट बोम्मई यांनी केले आहे.

(हेही वाचा – पोलीस भरतीत आता तृतीयपंथीयांनाही संधी, लवकरच लागू होणार ‘हे’ नवे नियम)

इतकेच नाही तर अमित शाहांच्या भेटीनंतरही मुद्दाम बोम्मई यांनी ट्विट करत अडमुठेपणा केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पुन्हा वाद चिघळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाविषयी कर्नाटकची कायदेशीर भूमिका मांडण्यासाठी लवकरच अमित शाह यांची भेट घेणार असल्याचेही बोम्मई यांनी सांगितले. शुक्रवारी (9 डिसेंबर) रोजी महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत खासदारांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांचं वक्तव्ये याची माहिती दिली.

काय केले ट्विट

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी असे ट्वीट केले की, “महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही, महाराष्ट्राने यापूर्वीही असा प्रयत्न केला आहे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे, सर्वोच्च न्यायालयात आमची कायदेशीर बाजू मजबूत आहे. आमचे सरकार सीमाप्रश्नावर कोणतीही तडजोड करणार नाही. राज्याची कायदेशीर भूमिका मांडण्यासाठी मी लवकरच केंद्रीय गृहमंत्र्यांनाही भेटणार आहे”

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.