काँग्रेसमध्ये लोकशाहीला खूप महत्व असून सर्वांचे मत लक्षात घेतल्यानंतरच मुख्यमंत्री ठरविण्यात येणार असल्याचे स्पष्ट मत कर्नाटक काँग्रेसचे प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी बुधवारी, १७ मे रोजी व्यक्त केले. यामुळे बुधवारी तरी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार काँग्रेसने जाहीर करणार नसल्याचे दिसून येते. तसेच अफवावर विश्वास ठेवू नका येत्या एक दोन दिवसात आम्ही स्वतः मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर करू असेही सुरजेवाला यांनी जाहीर केले.
काँग्रेस हायकमांडने सिद्धरामय्या यांना कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र डीके शिवकुमार यांना हा निर्णय मान्य नाही. सोनिया आणि राहुल गांधी यांच्याशी तासभर चर्चा करूनही सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री बनवण्यास ते राजी झाले नाहीत. अशा परिस्थितीत त्यांना स्वतः उपमुख्यमंत्री व्हायचे नाही. मात्र कर्नाटकातील सिद्धरामय्या यांच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना मुख्यमंत्री बनवल्यास त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार असल्याचे त्यांचे डी के यांचे म्हणणे आहे.
(हेही वाचा – दंगलीत विशिष्ट लोकांकडून अल्पवयीन मुलांचा वापर; सुजय विखे-पाटलांचं मोठं वक्तव्य)
दरम्यान, मुख्यमंत्री निवडीची प्रक्रिया सुरू असल्याचे कर्नाटक काँग्रेसचे प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले. निर्णय होताच आम्ही जाहीर करू. दोन-तीन दिवसांत मंत्रिमंडळ स्थापन होईल. पण शपथविधीची तयारी बंगळुरूच्या कांतीरवा स्टेडियममध्ये सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री पदाबाबत गेल्या चार दिवसांपासून बंगळुरू ते दिल्लीपर्यंत अनेक बैठका झाल्या. या शर्यतीत सिद्धरामय्या आघाडीवर होते. तत्पूर्वी, रविवारी झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सर्व आमदारांनी खरगे यांना नेता निवडीचे अधिकार दिले होते. यानंतर काँग्रेस अध्यक्षांनी निरीक्षकांना सर्व आमदारांशी वन टू वन चर्चा करण्यास सांगितले होते. त्यापैकी ८० हून अधिक आमदारांनी सिद्धरामय्या यांच्या बाजूने मतदान केले होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community