कर्नाटक अर्थसंकल्प २०२५ कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी सरकारचा (Karnataka Congress Government) अर्थसंकल्प सादर केला. मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात मुस्लिमांसाठी अनेक घोषणा केल्या. मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम कंत्राटांपैकी ४ टक्के कंत्राटे आता श्रेणी-२ ब अंतर्गत मुस्लिमांसाठी राखीव ठेवली आहेत. मुस्लिम मुलींसाठी १५ महिला महाविद्यालये उघडण्याची घोषणा केली आहे. मुसलमानांना निकाह म्हणजे विवाहासाठी ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. मतांच्या लांगूलचालनासाठी काँग्रेस सरकारने (Karnataka Congress Government) हलाल बजेट सादर केल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
मुस्लिमांवर उधळले पैसे
- मुस्लिमांसह अल्पसंख्याकांच्या लग्नासाठी ५० हजार रुपयांची मदत
- वक्फ मालमत्ता आणि स्मशानभूमींच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सरकार १५० कोटी रुपये
- मुस्लिम सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ५० लाख रुपये
- मुस्लिम बहुल भागात नवीन आयटीआय महाविद्यालयांची स्थापना, केईए अंतर्गत मुस्लिम विद्यार्थ्यांना ५० टक्के फी सवलत
याशिवाय, उल्लाल शहरातील मुस्लिम मुलींसाठी निवासी पीयू कॉलेज, मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आणि परदेशी शिष्यवृत्तींमध्ये वाढ, बेंगळुरूमध्ये हज भवनचा अतिरिक्त इमारतींसह विस्तार, मुस्लिम विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण देखील दिले जाईल. (Karnataka Congress Government)
Join Our WhatsApp Community