कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष के.आर. रमेश कुमार यांनी गुरुवारी राज्य विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी वेळ न दिल्याने नाराजी व्यक्त करत, वादग्रस्त टिप्पणी केली. विधानसभेत बोलताना के.आर. रमेश कुमार म्हणाले की, ‘एक म्हण आहे की जेव्हा तुम्ही बलात्कार थांबवू शकत नसाल, तेव्हा झोपा आणि मजा करा.
विधानसभेत असभ्य वक्तव्य
गुरुवारी राज्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानीवर बोलण्यासाठी काँग्रेस नेते वेळ मागत होते, मात्र सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी टाळण्याचा प्रयत्न करत होते. “तुम्ही जे काही ठरवाल ते मी हो म्हणेन. मी विचार करत आहे की आपण परिस्थितीचा आनंद घेत आहोत. मी व्यवस्था नियंत्रित करू शकत नाही किंवा त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही,” असे सभापतींनी आमदारांना सांगितले.
याआधीही केलीय अशी टिपण्णी
( हेही वाचा :इम्पिरिकल डेटा म्हणजे काय? १९३१ नंतर कधी केली जातीनिहाय गणना? )
Join Our WhatsApp Community