Karnataka: कर्नाटकात १०८ फूट उंच ‘हनुमान ध्वजा’वरून वाद, सर्व जिल्ह्यांत आंदोलन करण्याचा भाजप नेत्यांचा इशारा

प्रशासनाच्या या आदेशामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सुरुवातीला शनिवारी, (२७ जानेवारी) दुकाने बंद ठेवली, मात्र रविवारी ध्वज काढण्यासाठी पोलीस आल्याने प्रकरण तापले. लोकांनी पोलिसांविरोधात निदर्शने सुरू केली.

251
Karnataka: कर्नाटकात १०८ फूट उंच 'हनुमान ध्वजा'वरून वाद, सर्व जिल्ह्यांत आंदोलन करण्याचा भाजप नेत्यांचा इशारा
Karnataka: कर्नाटकात १०८ फूट उंच 'हनुमान ध्वजा'वरून वाद, सर्व जिल्ह्यांत आंदोलन करण्याचा भाजप नेत्यांचा इशारा

कर्नाटकातील (Karnataka) मंड्या येथील केरागोडू गावात रविवारी (२८ जानेवारी) पोलीस अधिकाऱ्यांनी १०८ फूट उंच हनुमान ध्वज हटवला. यानंतर येथे वादाला तोंड फुटले. गेल्या आठवड्यात ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीची परवानगी घेऊन हा हनुमान ध्वज फडकवला होता. त्यानंतर त्या विरोधात तक्रारी दाखल झाल्याने प्रशासनाने हा ध्वज काढण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.

प्रशासनाच्या या आदेशामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सुरुवातीला शनिवारी, (२७ जानेवारी) दुकाने बंद ठेवली, मात्र रविवारी ध्वज काढण्यासाठी पोलीस आल्याने प्रकरण तापले. लोकांनी पोलिसांविरोधात निदर्शने सुरू केली. गावकऱ्यांच्या आंदोलनात भाजप आणि बजरंग दलाचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते.

यावेळी संतप्त जमावाने स्थानिक आमदार रवी कुमार यांचे बॅनर फोडले. या घटनेनंतर गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांनी खांबावरून हनुमान ध्वज काढून तेथे तिरंगा लावला.

(हेही वाचा – Mahalakshmi Express: मुंबई-कोल्हापूर, मुंबई-नागपूर प्रवास अधिक सुरक्षित होणार; वाचा कारण)

या घटनेबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, जिथे तिरंगा फडकवला जातो तिथे भगवा फडकवणे नियमांच्या विरोधात आहे. राष्ट्रध्वज फडकवण्याची परवानगी घेण्यात आली होती, मात्र येथे दुसरा ध्वज फडकवण्यात आला. आम्ही मंदिराजवळ हनुमान ध्वज लावण्यासाठी तयार आहोत. आम्ही पण रामभक्त आहोत.

तसेच या प्रसंगाबाबत मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, राष्ट्रध्वजाऐवजी भगवा ध्वज फडकवण्यात आला आहे. यामागे राजकारण असू शकते. मला माहित नाही. यामागे कोण आहे. हा देश लोकशाही आणि संविधानाच्या अंतर्गत चालतो. मी अधिकारी, पोलीस आणि तरुणांशी बोललो आहे. आम्ही खासगी ठिकाणी किंवा मंदिराजवळ हनुमान ध्वज लावण्यासाठी तयार आहोत. आम्ही त्यांना पाठिंबा देऊ.

कर्नाटकातील जिल्ह्यात आंदोलन करणार
भाजप नेते आणि हिंदू कार्यकर्त्यांनी हनुमान ध्वज काढून टाकल्याचा तीव्र निषेध केला. भाजप नेते आर. अशोक यांनी राज्य कॉंग्रेस सरकारच्या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याबाबत आम्ही कर्नाटकातील सर्व जिल्ह्यांत आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजप नेत्यांनी दिला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.