Karnataka Election 2023 : मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या, तर उपमुख्यमंत्रीपदी डीके शिवकुमार; २० मे रोजी शपथविधी

कर्नाटकात (Karnataka Election 2023) सिद्धरामय्या आणि डि. के. शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्री पदावरून पेच निर्माण झाला होता. दोघेही पक्षातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते असल्याने मुख्यमंत्री पदाचे प्रकरण हायकमांडकडे गेले.

238
Karnataka Election 2023 : मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या, तर उपमुख्यमंत्रीपदी डीके शिवकुमार; २० मे रोजी शपथविधी

कर्नाटक विधानसभेच्या (Karnataka Election 2023) २२४ मतदारसंघांसाठी १० मे रोजी निवडणूक झाली. त्या निवडणुकीचा (Karnataka Election 2023) शनिवार १३ मे रोजी निकाल लागला. यामध्ये भाजप पक्षाला धक्का बसला असून काँग्रेस पक्षाने बाजी मारली आहे. निवडणुकीमध्ये बहुमत मिळालं असलं तरीही मुख्यमंत्री पदी कोणाची नेमणूक करायची हा मोठा प्रश्न काँग्रेस पक्षापुढे निर्माण झाला.

(हेही वाचा – Congress : राहुल गांधींचे सिद्धरामैय्या आवडते, तर शिवकुमार सोनियांचे; कर्नाटकाच्या मुख्यमंत्री पदावरून गांधी घराण्यातच मतभेद)

कर्नाटकात (Karnataka Election 2023) सिद्धरामय्या आणि डि. के. शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्री पदावरून पेच निर्माण झाला होता. दोघेही पक्षातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते असल्याने मुख्यमंत्री पदाचे प्रकरण हायकमांडकडे गेले.

दरम्यान, कर्नाटकच्या मुख्यमंत्री (Karnataka Election 2023) पदासाठी सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कमोर्तब झाले असल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. तर उपमुख्यमंत्रीपदी डीके शिवकुमार यांच्या नावाची चर्चा आहे. या दोघांचा शपथविधी सोहळा येत्या शनिवार २० मे रोजी होण्याची शक्यता वर्तवण्यात अली आहे.

हेही पहा – 

कर्नाटकचा (Karnataka Election 2023) मुख्यमंत्री ठरवण्याचा सर्वाधिकार काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे देण्यात आले होते. आमदारांशी चर्चा केल्यानंतर बहुतांशी आमदार हे सिद्धारमय्या यांच्यामागे असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली. त्यामुळे सिद्धारमय्या हे मुख्यमंत्री आणि डीके शिवकुमार हे उपमुख्यमंत्री होऊ शकतात अशा चर्चा काही दिवसांपासून रंगल्या होत्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.