कर्नाटकात भाजपने सोमवारी आपले व्हिजन डॉक्युमेंट सादर केल्यानंतर रविवारी काँग्रेसने आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. हा जाहीरनामा प्रसिद्ध करताना काँग्रेसचा Congress हिंदू द्वेष पुन्हा एकदा उघड्यावर आला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सादर केलेल्या जाहीरनाम्यात काँग्रेसने कर्नाटकच्या जनतेसाठी खैरात वाटताना कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर देखील काही मुद्दे त्यात समाविष्ट केले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने बजरंग दलासारख्या तरुणांच्या हिंदू संघटनेची तुलना काँग्रेसने दहशतवादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआयशी केली आहे, तसेच बजरंग दलावर बंदी घालण्याची धमकीही दिली आहे.
एरवी कोणतीही निवडणूक आली, की काँग्रेसचे Congress नेते टेम्पल रन सुरू करतात. मठ – मंदिरांमध्ये त्यांची धावपळ सुरू होते. पण प्रत्यक्ष जाहीरनामा सादर करताना त्यांचा हिंदु द्वेष उघड्यावर येतो. त्याचाच प्रत्यय कर्नाटकात आला आहे. त्यातूनच बजरंग दलावर बंदी घालण्याची घोषणा त्यांनी केली आहे. आपल्या जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी घालण्याची धमकी जरी काँग्रेसने दिली असली तरी त्याचा लोकशाही मार्गानेच प्रतिकार केला जाईल. असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे दिला आहे. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा या राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआयच्या देशविरोधी आणि घातपाती कारवायासमोर आल्यानंतर केंद्र सरकारने त्या संघटनेवर बंदी घातली आहे आणि सुप्रीम कोर्टाने देखील ती बंदी वैध ठरवली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने Congress मात्र बजरंग दलाची तुलना पीएफआयशी करून त्यावर बंदी घालण्याची धमकी देत सूडाचे राजकारण सुरू केल्याचे दिसून येते. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये बाकी वाटलेल्या खैरातीमध्ये मोफत वीज, महिला – युवकांना दोन हजार रुपये वगैरे बाबींचा समावेश आहे, पण जाहीरनाम्यातल्या बजरंग दलावरच्या बंदीच्या मुद्द्यावर काँग्रेस सोशल मीडियात जबरदस्त ट्रोल होत आहे.
(हेही वाचा Sharad Pawar : पक्षाच्या अध्यक्षपदावरील निर्णयावर शरद पवार २-३ दिवसांत अंतिम निर्णय घेणार)
Join Our WhatsApp Community