कर्नाटक विधानसभेच्या (Karnataka Election Results 2023) २२४ मतदारसंघांसाठी १० मे रोजी निवडणूक झाली. त्या निवडणुकीचा (Karnataka Election Results 2023) शनिवार १३ मे रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे जनतेचा कौल नेमका कोणाच्या पक्षात पडणार याकडे सर्व देशाचं लक्ष लागलं आहे. एक्झिट पोलचा कौल काँग्रेसच्या बाजूचे असला तरी त्यांचा अंदाज खरा ठरणार की भाजप बाजी मारणार हे या निकालातून निश्चित होणार आहे.
(हेही वाचा – Gyanvapi Masjid Case : हिंदूंचा मोठा विजय; शिवलिंगाचे वैज्ञानिक परीक्षण करण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश)
काँग्रेसच विजयी होणार
“काँग्रेसला (Karnataka Election Results 2023) अगदी सहजपणे १२० पेक्षा अधिक जागांसह बहुमत मिळेल”, असा दावा माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते के. रहमान खान यांनी केला आहे. ‘आज खूप मोठा दिवस आहे. काँग्रेस विजयी होईल अशी आम्हाला आशा आहे. आम्हाला अगदी सहजपणे १२० पेक्षा अधिक जागांसह बहुमत मिळेल. केवळ एक्झिट पोलने काँग्रेसच्या विजयाचा अंदाज वर्तवलेला नाही, तर जनतेला बदल हवा आहे.’ अशा शब्दांत त्यांनी आपलं मत मांडलं आहे.
Karnataka | It's a big day today. We are hopeful that Congress will emerge victorious. We should get a comfortable majority with more than 120 seats. It's not just the exit polls that predict Congress victory, the same is also visible on the ground level, people want change: K… pic.twitter.com/HAWDM9VDC2
— ANI (@ANI) May 13, 2023
हेही पहा –
२,६१५ उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद
विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Election Results 2023) एकूण २,६१५ उमेदवार उभे आहेत. त्यामध्ये २,४३० पुरुष तर १८४ महिला उमेदवार आणि एक तृतीयपंथीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य १० मे रोजी मतदान पेटीत बंद झालं.
Join Our WhatsApp Community