कर्नाटक विधानसभेच्या (Karnataka Election Results 2023) २२४ मतदारसंघांसाठी १० मे रोजी निवडणूक झाली. त्या निवडणुकीचा (Karnataka Election Results 2023) शनिवार १३ मे रोजी निकाल लागला. यामध्ये भाजप पक्षाला धक्का बसला असून काँग्रेस पक्षाने बाजी मारली आहे.
Congratulations to the Congress Party for their victory in the Karnataka Assembly polls. My best wishes to them in fulfilling people’s aspirations.
— Narendra Modi (@narendramodi) May 13, 2023
कर्नाटकातील निवडणूक ही भाजपसाठी प्रतिष्ठेची होती, भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्येच अटीतटीची मुख्य लढत सुरू होती. बऱ्याच एक्झिट पोलनुसार कर्नाटक निवडणुकीचा अंदाज वर्तवण्यात आला होता. काही एक्झिट पोलनुसार कर्नाटकात त्रिशंकू विधानसभा निर्माण होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. कर्नाटकात भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
I thank all those who have supported us in the Karnataka elections. I appreciate the hardwork of BJP Karyakartas. We shall serve Karnataka with even more vigour in the times to come.
— Narendra Modi (@narendramodi) May 13, 2023
कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील यशाबद्दल पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) आपली पहिली प्रतिक्रिया देत काँग्रेसचं कौतुक केलं आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विजयाबद्दल त्यांचं अभिनंदन आणि लोकांच्या अपेक्षा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा! असं ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) काँग्रेसला शुभेच्छा दिल्या.
हेही पहा –
कर्नाटक निवडणुकीत ज्यांनी भाजप (Narendra Modi) पक्षाला पाठिंबा दिला त्या सर्वांचे मी आभार मानतो, असेही ते म्हणाले. मी भाजप कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे कौतुक करतो, असं मोदी (Narendra Modi) म्हणाले. आगामी काळात आम्ही कर्नाटकची सेवा आणखी जोमाने करू, असं ट्विट मोदींनी केलं आहे आणि भाजपलाही पुढील वाटचालीसाठी बळ दिलं आहे.
Join Our WhatsApp Community