कर्नाटक विधानसभेच्या (Karnataka Election Results 2023) २२४ मतदारसंघांसाठी १० मे रोजी निवडणूक झाली. त्या निवडणुकीचा (Karnataka Election Results 2023) शनिवार १३ मे रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे जनतेचा कौल नेमका कोणाच्या पक्षात पडणार याकडे सर्व देशाचं लक्ष लागलं आहे. एक्झिट पोलचा कौल काँग्रेसच्या बाजूचे असला तरी त्यांचा अंदाज खरा ठरणार की भाजप बाजी मारणार हे या निकालातून निश्चित होणार आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या सर्व परिस्थितीवर आपली पहिला प्रतिक्रिया देत नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
(हेही वाचा – Karnataka Election Results 2023 : कर्नाटक निवडणूक : जनतेचा कौल कोणाच्या बाजूने?)
काय म्हणाले संजय राऊत?
“कर्नाटकच्या (Karnataka Election Results 2023) जनतेने मोदी-शाहांना झिडकारलं आहे, हे मान्य करा. अनेक ठिकाणी महाराष्ट्रातील भाजपा नेते गेले. ते जिथे जिथे गेले तिथे तिथे भाजपाचा मोठा पराभव झाला. महाराष्ट्रातून भाजपा नेत्यांची मोठी टोळी काँग्रेस, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवासाठी कर्नाटकात गेली. त्या प्रत्येक ठिकाणी भाजपाचा दारूण पराभव झाला. कर्नाटकातील निकाल (Karnataka Election Results 2023) २०२४ साठी विरोधी पक्षांसाठी सत्तेचा दरवाजा उघडणारा असेल. २०२४ मध्ये असाच निकाल लागेल. ही एक लोकभावना आहे. देशाची मन की बात कर्नाटकातून बाहेर पडली.”
अशा शब्दांमध्ये संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप पक्षावर टीका केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community