Karnataka Election Results 2023 : मोदी – शाह यांच्या फोडाफोडीच्या राजकारणाला जनता वैतागली – शरद पवार

जनतेचा भाजपवर रोष होता हे यामधून स्पष्ट झाले आहे.

202
Karnataka Election Results 2023 : मोदी - शाह यांच्या फोडाफोडीच्या राजकारणाला जनता वैतागली - शरद पवार

कर्नाटक विधानसभेच्या (Karnataka Election Results 2023) २२४ मतदारसंघांसाठी १० मे रोजी निवडणूक झाली. त्या निवडणुकीचा (Karnataka Election Results 2023) शनिवार १३ मे रोजी निकाल लागला आहे. या निकालानुसार भाजप पक्षाला धक्का बसला असून काँग्रेस पक्षाने बाजी मारली आहे. काही दिवसांपूर्वी एक्झिट पोलचा कौल देखील काँग्रेसच्या बाजूने दिला होता. त्यानुसार जनतेने देखील अंतिम निर्णय काँग्रेसच्या बाजूने दिला आहे. आता मुख्यमंत्री पदाची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सर्व परिस्थितीवर राष्ट्रीय पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली.

(हेही वाचा – Karnataka Election Results 2023 : भाजपाला धक्का; काँग्रेस पक्षाची आघाडी)

नेमकं काय म्हणाले शरद पवार?

“नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या फोडाफोडीच्या, खोक्याच्या राजकारणावर जनतेकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. याचं उत्तम उदाहरण कर्नाटकमध्ये आता दिसलं आहे. जनतेचा भाजपवर रोष होता हे यामधून स्पष्ट झाले आहे. मी कर्नाटकच्या जनतेचं आणि काँग्रेसचं अभिनंदन करतो. त्यांनी भाजपाला धडा शिकवला. आता ही प्रक्रिया देशभरात होईल. आता केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, राजस्थान, दिल्ली, झारखंड, पंजाब, पश्चिम बंगालमध्ये देखील आता भाजपाचं राज्य नाही. त्यामुळे बहुसंख्य राज्यात भाजपा सत्तेच्या बाहेर आहे. सत्तेचा गैरवापर केल्याने भाजपवर ही वेळ आली आहे. तसेच ‘मोदी है तो मुमकीन है’ असं आता काही उरलेलं नाही. २०२४च्या निवडणुकीत काय चित्र दिसणार आहे, याचा एक अंदाज कर्नाटकच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला येऊ शकतो.” अशा शब्दांत शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपली भूमिका मांडली.

हेही पहा – 

काँगेस विजयी

काँग्रेस १३४ जागांवर आघाडीवर आहे. म्हणजेच काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत असून मोठी उलथापालथ झाली नाही तर संख्याबळात बदल होण्याची अपेक्षा नाही. सत्ताधारी भाजप ६५ जागांवर आघाडीवर असून, बहुमताच्या फार मागे आहेत. त्यावेळी राज्यात किंगमेकर बनण्याची आशा असलेला जेडीएस २१ जागांवर पुढे आहे. इतरांची ४ जागांवर आघाडीवर आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.