जात धर्मापेक्षा शिक्षणावर लक्ष केंद्रित करा, हिजाबवर उच्च शिक्षण मंत्र्यांचं मत!

108

शाळा महाविद्यालयांमध्ये गणवेष परिधान केला जावा की नाही याऐवजी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षणावर अधिक लक्ष द्यावं, तसेच आपल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिगडू नये, याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावं, असं उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे.

शिक्षणाला महत्त्व द्या

भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे रुईया महाविद्यालयामध्ये आदरांजली सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना, उदय सामंत यांनी कर्नाटकात पेटलेल्या हिजाब प्रकरणाचे महाराष्ट्रात जे पडसाद उमटले आहेत त्यावर त्यांनी शिक्षणाला अधिक महत्त्व दिलं गेलं पाहिजे असं म्हणत आपलं मत स्पष्ट केलं आहे. आपण शाळा महाविद्यालयाच्या आवारात येत असताना, जात-पात धर्म बाजूला ठेऊन यायला हवं, विद्यार्थ्यांनी हा विचार करावा की आपण येथे शिकण्यासाठी येतो. आपल्यात ऐक्य असतं आणि आपल्यातलं ऐक्य जर का कोणी तोडत असेल, तर ती शक्ती आपण मोडून काढायला पाहिजे. आपल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिगडू नये याचा विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे, असं सामंत यांनी यावेळी स्पष्ट केलं.

( हेही वाचा: बापरे…’चलो अ‍ॅप’मुळे कंडक्टर होणार गायब? )

पहिलं संगीत महाविद्यालय

तसेच, लता दिदींचे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारण्याचे स्वप्नही आम्ही साकार करणार असल्याचे, त्यांनी यावेळी सांगितले. देशातलं हे पहिल अतिशय उत्कृष्ट असं आंतरराष्ट्रीय दर्जाचं संगीत महाविद्यालय असणार आहे. त्यासाठी एक समिती सुद्धा गठीत करण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.