काँग्रेसने मला ९१ वेळा शिव्या दिल्या – पंतप्रधान नरेंद्र मोदी

194

काँग्रेसने मला ९१ वेळा शिव्या दिल्या असून ते वारंवार अशाच सगळ्या समाजांना शिव्या देत सुटले आहेत. कर्नाटक मधली जनता या शिव्यांना मतदानाद्वारे प्रत्युत्तर देईल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस नेत्यांना दिला. मल्लिकार्जुन खर्गे यांनी दोन दिवसांपूर्वी पंतप्रधानांना विषारी साप म्हटले होते. त्यापार्श्वभूमीवर कर्नाटकच्या हुमनाबाद येथे आयोजित सभेत मोदींनी प्रत्युत्तर दिले.

यावेळी पंतप्रधान म्हणाले की, काँग्रेस आतापर्यंत मला ९१ वेळा शिव्या देऊन आपला वेळ शिव्यांच्या डिक्शनरीत घालवला. तो वेळ त्यांनी चांगले शासन देण्यात घालवला असता तर काँग्रेसची एवढी दुर्दशा झाली नसती. काँग्रेस नेत्यांनी पूर्वी चौकीदार चोर आहे, मोदी चोर आहे सगळा ओबीसी समाज चोर आहे, अशा शिव्या दिल्या. कर्नाटकात आता त्यांनी लिंगायत समाजालाही चोर म्हटले आहे. सगळ्या समाजांना काँग्रेसने दुखावून ठेवले आहे. कर्नाटकची जनता काँग्रेसच्या या शिवीगाळीला मतदान यंत्राद्वारे चोख प्रत्युत्तर देईल, अशा कठोर शब्दांत मोदींनी काँग्रेसच्या नेत्यांवर शरसंधान साधले.

(हेही वाचा – Barsu Refinery: समन्वयानेच बारसू प्रकल्पाची उभारणी होणार – उदय सामंत)

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदींचा उल्लेख विषारी साप असा केला होता. त्यानंतर देशभरात उठलेल्या राजकीय गदारोळानंतर आपल्याला कोणावरही व्यक्तिगत टीका करायची नसल्याची मखलाशी खर्गे यांनी केली होती. पण त्यातूनही काँग्रेस विरुद्धचा राग शमला नाही. हुमणाबादमध्ये आजच्या सभेत मोदींनी काँग्रेसने दिलेल्या शिव्यांचा उल्लेख करून त्या पक्षाच्या नेत्यांवर जोरदार प्रहार केला आहे. काँग्रेसने मोदींना दिलेल्या शिव्यांची एक यादीच सोशल मीडियावर फिरत आहे. त्या यादीचा मोदींनी आपल्या भाषणात संदर्भ देऊन काँग्रेसवर शरसंधान साधले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.