कर्नाटकात सध्या शाळा-महाविद्यालयांमध्ये मुस्लिम विद्यार्थिनी हिजाब घालण्यावर आग्रही बनल्या आहेत. त्यासाठी विद्यार्थिनी अक्षरशः रस्त्यावर उतरल्या आहेत. मात्र हिंदू विद्यार्थिनी भगवा स्कार्फ घालून महाविद्यालयात येऊ लागल्याने वाद निर्माण होऊ लागला आहे. या प्रकरणी उडुपी जिल्ह्यातील बिंदूर गावातील गव्हर्नमेंट प्री-विद्यापीठ कॉलेजात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यावर आता महाविद्यालय प्रशासनाने हिजाब घालून येणाऱ्या विद्यार्थिनीना स्वतंत्र वर्गात बसवले जाईल, जेव्हा त्या ड्रेस कोडमध्ये येतील, तेव्हाच त्यांना वर्गात बसवण्यास परवानगी देण्यात येईल, असा निर्णय महाविद्यालयाने घेतला आहे.
सर्वांना समान ड्रेस घालावा लागणार
हा वाद आता इतका पेटला आहे की, महाविद्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी बजरंग दलाने विद्यार्थीनींनी भगवा स्कार्फ घालण्याची सक्ती केली आहे. तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये जय श्रीरामचे नारेही दिले जात आहेत. कुंदापुरातील शाळा-महाविद्यालयात जय श्रीरामचे नारे दिल्याने वातावरण तंग झाले आहे. उडुपी जिल्ह्यातील बिंदूर गावातील गव्हर्नमेंट प्री-विद्यापीठ कॉलेजात ही घटना घडली. या घटनेमुळे शाळा आणि महाविद्यालयात एकच खळबळ उडाली आहे. प्राचार्यांनी हिंदू संघटनांना भगवा स्कार्फ परिधान करण्याची मोहीम मागे घेण्याची विनंती केली आहे. मात्र हिंदू संघटना अधिकच आक्रमक झाल्याने शाळेतील वातावरण अधिकच तंग झाले आहे. या वादामुळे कर्नाटक सरकार कर्नाटक एज्युकेशन अॅक्ट 1983चे कलम 133 लागू केले आहे. त्यामुळे सर्वांना समान ड्रेस घालावा लागणार आहे. खासगी शाळा स्वत:चा ड्रेस कोड निवडू शकणार आहेत. तर सरकारी शाळांमध्ये ठरलेला ड्रेसच घालून यावे लागणार आहे. या आदेशामुळे हिजाबचा वाद अधिकच वाढला आहे. सोशल मीडियातून यावर टीकाटीप्पणी सुरू आहे.
We want UCC🇮🇳
Equal law for every one. pic.twitter.com/kn991OT99P— Ujjawal kumar jha (@_Ujjawal_7) February 6, 2022
का सुरु झाला वाद?
विद्यार्थीनी भगवा स्कार्फ घालून येत असून त्यांना पोलीस कॉलेजात जाण्यापासून मज्जाव करत आहेत. जर भगवा स्कार्फ घालून येणाऱ्या विद्यार्थीनींना महाविद्यालयात प्रवेश मिळत नसेल तर हिजाब घालून येणाऱ्या मुलींनाही महाविद्यालयात प्रवेश देऊ नये, अशी मागणी बजरंग दलाचे जिल्हा सचिव सुरेंद्र कोटेश्वर यांनी केली आहे. जानेवारीत उडुपीच्या एका सरकारी महाविद्यालयात सहा विद्यार्थीनींना हिजाब घालून महाविद्यालयात येण्यास मज्जाव करण्यात आला. मात्र महाविद्यालयाने परवानगी दिली नाही, असे सांगितले गेले. त्यानंतर हा ट्रेंड निघून गेला. तसेच दुसऱ्या महाविद्यालयातही विद्यार्थीनी हिजाब घालून जाऊ लागल्या. त्याला विरोध म्हणून काही विद्यार्थीनींनी भगवा स्कार्फ घालून महाविद्यालयात जायला सुरुवात केली. त्यानंतर त्याला राजकीय वळण मिळाले आणि वादाला सुरुवात झाली.
https://twitter.com/shuja_2006/status/1490028072825159680?s=20&t=IQr_OyVdaHen_PZGzYRKUQ
(हेही वाचा शाहरूख खान लता ताईंच्या पार्थिव देहावर थुंकला? सोशल मीडियावर झाला ट्रोल)
Join Our WhatsApp Community