पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केल्याबद्दल काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम (Karti Chidambaram) यांना पक्षाने कारणेदाखवा नोटीस बजावली आहे. तसेच या नोटीशीला 10 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश चिदंबरम यांना दिले आहेत.
मोदी हे राहुल गांधीच्या तुलनेत अधिक लोकप्रिय –
काँग्रेसचे दिग्गज नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम (Karti Chidambaram) यांनी एका मुलाखतीत ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधीच्या तुलनेत अधिक लोकप्रिय’ असल्याचे विधान केले होते. हे विधान आता कार्ती चिदंबरम यांच्यासाठी अडचणीचे ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधी यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय आहेत असे म्हटल्याबद्दल तामिळनाडू प्रदेश काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचे प्रमुख के. आर. रामसामी यांनी कार्ती चिदंबरम यांना कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. तसेच १० दिवसांच्या आत या नोटीशीला उत्तर देण्याचे निर्देश देखील दिले आहेत.
(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : मंदिरासाठी ‘१४ सुवर्ण जडीत’ दरवाजे होत आहेत तयार)
नोटीस बजावण्याचा अधिकार केवळ ए. आय. सी. सी. ला –
खासदारांना नोटीस बजावण्याचा अधिकार केवळ ए. आय. सी. सी. ला आहे, असा दावा कार्ती (Karti Chidambaram) यांच्या सूत्रांनी केला आहे. मात्र, तामिळनाडू काँग्रेसने त्यांना नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी ईव्हीएम मशिनवर विश्वास दाखवला आहे.
(हेही वाचा – Shooting Asian Qualifiers : रुद्रांक्ष पाटील आणि मेहुली घोष यांना मिश्र दुहेरीत सुवर्ण)
नेमकं काय म्हणाले कार्ती चिदंबरम ?
खरे तर एका मुलाखतीत कार्ती (Karti Chidambaram) यांना विचारले गेले होते की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे पंतप्रधान मोदींसमोर उभे राहण्यास योग्य उमेदवार आहेत का, यावर त्यांनी उत्तर दिले की, “भाजपच्या प्रचार यंत्रणेसमोर कोणीही स्पर्धा करू शकत नाही. भाजपाची प्रचार यंत्रणा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकत्र हरवणे कठीण आहे. पण समस्यांच्या बाबतीत आम्ही भाजपला पराभूत करू शकतो. एक राजकीय पक्ष म्हणून आम्ही भाजपला पराभूत करू शकतो. मात्र पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेचा निवडणुकीवर मोठा परिणाम होत आहे. (Karti Chidambaram) जर तुम्ही कोणाला त्यांच्या समोर उभे राहण्यास सांगितले तर मी एक नाव सांगू शकत नाही. मात्र, जर काँग्रेसच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना विचारले तर ते राहुल गांधी हेच नाव सांगतील.” (Karti Chidambaram)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community