निवडणूक आयोगाने नुकत्याच काही ठिकाणच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. यामध्ये कोल्हापूरमधील उत्तर मतदारसंघाचा समावेश आहे. या पोटनिवडणुकीसाठी 12 एप्रिल रोजी मतदान आहे. त्यामुळे येथे निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. यात विशेष म्हणजे करुणा- शर्मा मुंडे या सुद्धा ही निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले जात आहे. करूणा शर्मा यांनी शिवशक्ती सेना या पक्षाची स्थापना केलेली आहे. याच पक्षाकडून त्या निवडणूक लढवणार आहेत. मात्र येथे विजय झाला तर २०२४ मध्ये बीडमधून धनंजय मुंडे यांच्याविरोधात विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे करूणा शर्मा यांनी सांगितले आहे.
निवडणूक लढवणार
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा यांनी मुंडेंवर केलेल्या आरोपानंतर त्या खूप चर्चेत आल्या होत्या. आता त्या देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चर्चा आहे. मागच्या काही महिन्यांपूर्वीच करुणा शर्मा यांनी शिवशक्ती सेना पक्ष स्थापन केला आहे.
( हेही वाचा :राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदासाठी ‘या’ नेत्यांची नावे चर्चेत! )
माझ्यावर अन्याय झाला तेव्हा…
एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना, करुणा शर्मा म्हणाल्या की, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत नवरा विरुद्द बायको अशी लढत नक्की होणार. धनंजय मुंडे विरुद्ध करुणा मुंडे अशी ही लढत असेल. माझ्यावर जेव्हा अन्याय झाला तेव्हा कोणी आवाज उठवला नाही. आता पुन्हा संधी आहे. लोकांनी मला साथ द्यावी. आज इतके पक्ष असतानाही प्रचंड भ्रष्टाचार होत असून, कोणीही आवाज उठवत नाही. मी आवाज उठवला आहे, मला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, असेही करूणा शर्मा म्हणाल्या.
Join Our WhatsApp Community