कसबा, चिंचवड पोट निवडणुकीत ठाकरे गटाला संधी नाहीच

196
कसबा आणि चिंचवड या दोन ठिकाणी पोट निवडणुकीमध्ये ठाकरे गट कसबा मतदार संघातून इच्छूक आहे. तशी स्पष्टोक्ती अनेकदा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली होती, प्रत्यक्षात मात्र महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पुन्हा एकदा ठाकरे गटाला ‘त्याग’ करायला भाग पाडले आहे. या दोन्ही ठिकाणांपैकी कसबा येथून काँग्रेस तर चिंचवड येथून राष्ट्रवादी काँग्रेस आपला उमेदवार उभा करणार असल्याचे निश्चित झाले आहे.
कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवार कोण असणार याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. अशातच या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. तर चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आपला उमेदवार उभा करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. कसबा मतदारसंघातून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर चिंचवड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीकडून राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती आहे.

दोन्ही जागा बिनविरोध करण्याचा प्रयत्न : देवेंद्र फडणीवस

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक आणि मुलगा कुणाल टिळक यांची भेट घेतली. कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. मात्र, दुसरीकडे महाविकास आघाडीने आपले उमेदवार निवडणुकीत उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. अशातच आता फडणवीस यांच्या मनातील उमेदवार नेमका कोण? हे पाहणे उत्सूकतेचे ठरणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.