Kasba By Election: हिंदू महासंघाच्या उमेदवाराची मनसेला खुली ऑफर; म्हणाले, …तर एक आमदार वाढेल

147

पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक होत आहे. या मतदारसंघातील निवडणुकीसाठी ३३ उमेदवार रिंगणात उतरले आहे. मात्र भाजप आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये थेट लढत आहे. याशिवाय आम आदमी पक्ष आणि हिंदू महासंघासह अनेक अपक्ष उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. मात्र मनसेने या मतदारसंघात आपला उमेदवार उतरवला नसून कोणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही. अशात हिंदू महासंघाच्या उमेदवाराने मनसेला खुली ऑफर दिली आहे. पण ही ऑफर मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वीकारणार का? याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

काय दिली ऑफर?

हिंदू महासंघाचे उमेदवार आनंद दवे कसबा पोटनिवडणूक लढणार आहेत. त्यांनी कसबा पोटनिवडणुकीत मनसेने आपल्याला पाठिंबा द्यावा, यामुळे त्यांचा एक आमदार वाढेल, अशी खुली ऑफर दिली आहे. आता याबाबत मनसे काय भूमिका घेते हे येत्या काळात समजेल.

सध्या कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस पक्षाने जोरदार प्रचार सुरू केला आहे. यादरम्यानच काँग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. पक्षातील नेत्यांनी समजूत काढल्यानंतर दाभेकर यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्या मुख्य लढत पाहायला मिळणार आहे.

(हेही वाचा – कसबा-चिंचवड पोटनिवडणुक जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली; ‘या’ नेत्यांच्या खांद्यावर दिली मोठी जबाबदारी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.