भारतीय वंशाचे Kash Patel एफबीआयचे नवे संचालक; अमेरिकन सिनेटची नियुक्तीला मंजूरी

48
भारतीय वंशाचे Kash Patel एफबीआयचे नवे संचालक; अमेरिकन सिनेटची नियुक्तीला मंजूरी
भारतीय वंशाचे Kash Patel एफबीआयचे नवे संचालक; अमेरिकन सिनेटची नियुक्तीला मंजूरी

भारतीय वंशाचे काश पटेल (Kash Patel) यांच्या अमेरिकेतील फेडरल ब्युरो ऑफ इनव्हेस्टिगेशन (Federal Bureau of Investigation) म्हणजे एफबीआय (FBI) या गुप्तचर संस्थेच्या संचालक पदावरील नियुक्तीला अमेरिकन सिनेटने मंजूरी दिली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर समर्थक म्हणून काश पटेल यांना ओळखले जाते. सिनेटमध्ये झालेल्या मतदानात भारतीय वंशाचे काश पटेल (Kash Patel) यांना एफबीआयचे (FBI) पुढील संचालक म्हणून नियुक्त करण्याच्या बाजूने ५१ मते तर विरोधात ४९ मते पडली. रिपब्लिकन पक्षाच्या सुसान कॉलिन्स आणि लिसा मक्रोव्स्की (Lisa Makrovsky) यांनी देखील डेमोक्रॅटीक पक्षाच्याबरोबर पटेल यांच्या नियुक्तीच्या विरोधात मत दिले.

( हेही वाचा : Delhi Cabinet Ministers : दिल्लीतील शपथविधीनंतर 4 तासांत खातेवाटप ; कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळाले ते जाणून घ्या …)

मुळात डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अध्यक्ष पदाची निवडणुक जिंकल्यानंतर लगेच पटेल (Kash Patel) यांच्याकडे एफबीआयची (FBI) जबाबदारी सोपवण्याचे वचन दिले होते. त्यावर आता सिनेटने शिक्कामोर्तब केले आहे. काश पटेल (Kash Patel) यांचे भारतातील गुजरातशी संबंध राहिलेला आहे. पटेल (Kash Patel) यांनी यापूर्वी डिफेंडर आणि न्याय विभागात दहशतवाद विरोधी अभियोक्ता म्हणून काम केले आहे. तरी आता एफबीआयचे (FBI) संचालक म्हणून काश पटेल १० वर्ष हा पदभार सांभाळतील.

कोण आहेत काश पटेल?

काश पटेल यांचे भारताशी खास नाते राहिलेले आहे. त्यांचे आई-वडील गुजरातहून न्यूयॉर्कच्या गार्डनर सिटी येथे स्थायिक झाले होते. ते दोघेही आधी कॅनडा येथे राहिले नंतर १९७० मध्ये अमेरिकेत गेले. कायद्याचे शिक्षण घेतलेले काश पटेल हे आपली गुजराती ओळख कायम अभिमानाने सांगतात. काश पटेल यांनी रिचमंड विद्यापीठ आणि पेस यूनीव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉ येथून कायद्याची पदवी घेतली आहे. पटेल (Kash Patel) यांनी २०१७ मध्ये तात्कालीन ट्रम्प प्रशासनात शेवटचे काही दिवस चीफ ऑफ स्टाफ म्हणून देखील काम केले होते. (Kash Patel)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.