32 वर्षांपूर्वी काश्मिरी पंडितांसाठी ठरली ‘ती’ काळरात्र! नेटक-यांनी अशा जागवल्या आठवणी…

175

स्वातंत्र्याच्या 44 वर्षानंतर केवळ मुसलमानांचे लांगूलचालन करण्यासाठी काँग्रेसने काश्मिरात हिंदू पंडितांचा वंशविच्छेद होऊ दिला. हिंदूंच्या आया-बहिणींची अब्रू लुटू दिली, जे धर्मांतर करणार नाहीत, त्या महिला – पुरुषांना अत्याचार करून ठार करण्यात आले. काश्मिरी पंडितांना ‘तुम्ही तुमची घरे, संपत्ती आणि बायका-मुली सोडून रातोरात राज्य सोडून जा’ असे सांगण्यात आले. सकाळी जे दिसले त्यांना ठार करण्यात आले. हा सगळा प्रकार काँग्रेसच्या राजवटीत घडला. आज 32 वर्षे उलटली, तरी काश्मिरी पंडितांचा तो वंशविच्छेद होता, हे काँग्रेसने मान्य केले नाही, हे हिंदूंसाठी दुर्दैव आहे. आज त्या अमानवीय अत्याचाराला 32 वर्षे उलटली, यानिमित्ताने नेटक-यांनी या नरसंहाराच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला आहे.

प्रत्यक्ष अनुभवाचे केले कथन

नागेश नावाच्या नेटकरीने ट्विट करत एक व्हिडिओ शेअर केला आहे, या व्हिडिओतील महिला त्यावेळी झालेल्या अत्याचारांवर बोलताना दिसत आहे. या नेटकरीने हा व्हिडिओ शेअर करताना म्हटलयं की, काश्मिरी पंडितांना घाबरवण्यासाठी लाउड स्पीकरवर घोषणा दिल्या जायच्या, इस्लाम स्वीकारा, नाहीतर मरण्यासाठी तयार व्हा. ज्यांनी नकार दिला, त्यांची निघृण हत्या करण्यात आली आणि महिलांवर सामूहिक बलात्कार केले गेले. त्यांनी सहन केलेल्या वेदना मांडण्यासाठी शब्दच अपूरे असल्याचे त्याने म्हटले आहे. 

देवाशीष कुलकर्णी या ट्विटर हॅंडलवरुन काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराबाबत ट्विट करण्यात आले आहे. हा नेटकरी आपल्या ट्विटमध्ये म्हणतो की, आजच्याच दिवशी 4 लाख काश्मिरी पंडितांना 3 विकल्प दिले गेले, धर्मांतर करा, मरा नाहीतर मग काश्मिर सोडा. ज्या काळरात्रीनंतर काश्मिरी पंडितांना आपल्याच देशात विस्तापित म्हणून रहावं लागलं, आज त्या अमानुष प्रकाराला 32 वर्ष पूर्ण झाली आहेत.

( हेही वाचा :Work From Home मुळे महिलांवर तिप्पट भार, राष्ट्रपतींनी केली चिंता व्यक्त! )

32 वर्षांपूर्वी आलेल्या त्या काळरात्रीने शेकडो जीवांचं जीवन कायमच बदलून टाकलं. त्यांच्यासाठी नुसती कल्पना करणं सुद्धा खूप कठीण आहे ज्यांनी हा नरसंहार पाहिला नाही. असं भावनिक ट्विट अविनाश कौल यांनी केले आहे.

एकेकाळी मोठ्या दिमाखात उभ्या असणा-या या घरात काश्मिरमधील साहित्यिक नामवंत व्यक्तींचं वास्तव्य होतं. जसे की वासुदेव रेह, विश्वनाथ विश्वास, एच.के. भारती. पण, त्या क्रूर लोकांनी काहीही सोडलं नाही, फक्त तीन पर्याय दिले, धर्मांतर करा, मरा नाहीतर मग कश्मिर सोडा, असं ट्विट संजय पंडित यांनी केले आहे.

( हेही वाचा: भारतातील सर्वोच्च फूटबाॅल स्टेडिअम तुम्ही पाहिलंत का? बघा फोटो )

हिंदू हे काश्मिरचे स्थानिक होते. त्यांना जबरदस्ती घर सोडण्साठी भाग पाडलं गेलं. त्यांना त्यांची घर पुन्हा मिळायला हवीत तो त्यांचा अधिकार आहे. 31 वर्षांपूर्वीच्या या घटनेला विसरु नका आणि माफही करु नका. अशा आशयाचं ट्विट एका नेटक-याने केले आहे.

11 हजार 686 दिवसांपूर्वी, एका मध्यरात्री काश्मीरवासियांचा नरसंहार केला. मशिदी सोडून संपूर्ण काश्मीरमध्ये वीज कापण्यात आली आणि लाउड स्पीकरवरुन घोषणा करण्यात आली की, काश्मिरी पंडितांनी धर्मांतर करावे अन्यथा मरा नाहीतर मग काश्मीर सोडून निघून जा. ती काळरात्र आजही संपलेली नाही. अजूनही आम्ही उष:कालाची वाट पाहात आहोत, असं भावनिक ट्विट एका नेटक-याने केले आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.