सध्या महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर काढून टाका, अशी मागणी होत आहे. त्यावर गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याविषयावर पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ‘मराठे सर्व लढाया हरत होते, पण औरंगजेब एकही लढाई जिंकू शकत नव्हता. छत्रपती शिवाजी, संभाजी महाराजांचे निधन झाल्यानंतर तो दिल्लीला गेला असता. मोठा राजा होता. पण त्याला शिवाजी नावाची भीती वाटत होती. त्यामुळे तो दोन अडीज जिल्ह्यांसाठी इथेच थांबला होता. जी कबर आहे ना, ती सजवलेली काढून टाका तिथे फक्त कबर दिसुद्या. तिथे एक मोठा बोर्ड लावा. आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला, हा आमचा इतिहास आहे, असे राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.
अफजलखान जेव्हा प्रतापगडावर मारला गेला तिथेच त्याला पुरला. त्याला पुरला ते शिवाजी महाराजांच्या होकाराशिवाय झाले नसेल. महाराजांना विचारल्याशिवाय ते केले नसेल. जगाला कळू दे इथे कोणाला गाडलेय. महाराजांनी विचार केला नसेल. मुलांच्या सहली बसेस भरून घेऊन जा, त्यांना सांगा आपल्या महाराजांनी याला गाडला. पुढच्या पिढीला काय सांगणार आहोत. तरुणांना विनंती आहे, इतिहास व्हॉट्सअपवर वाचायचे बंद करा. विकी कौशल मेल्यावर संभाजी महाराज तुम्हाला समजले का, अक्षय खन्नामुळे औरंगजेब समजला का, चित्रपट पाहून जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत, इतिहास जाणून घेण्यासाठी इतिहासाची पुस्तके वाचावी लागतात आणि जेव्हा तुम्ही इतिहासाची पाने वाचाल तेव्हा तुमच्या भावनांचे आणि अस्मितांची भांडी फुटतील, मुळात विषय वेगळे असतात आणि तुम्हाला भरकटविले जाते, असेही राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.
मुंबईचा विमानतळ दिला अदानीला, नवी मुंबईचा अदानीला, बंदर दिले अदानीला, तो हुशार निघाला आणि आम्ही अडाणी ठरलो, अशी टीका राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली. अफजलखानाचा वकील कुळकर्णी नावाचा ब्राम्हण होता. शिवाजी महाराजांचा वकीलही ब्राम्हणच होता. तेव्हा सगळी माणसे कोणा ना कोणाकडे कामाला होती. त्यावेळेला काय निर्णय कोणत्या परिस्थितीत घेतले गेले असतील काय माहिती. आता साडेतीनशे वर्षांनी का चर्चा केली जातेय. महाराजांच्या समोर संभाजी महाराजांनी औरंगजेबाची ५०००ची मनसबदारी स्वीकारली होती. महाराजांचा होकार असल्याशिवाय होईल. आता दरबारात अडकलोय, पुढचे पुढे पाहू, राजकारण असते ते. या आताच्या लोकांना कशाचे काही माहिती नाही. मिर्झाराजे हिंदू होता ना. सिंहगडावर तानाजी यांच्यासोबत लढणारा उदयभान रजपूत, हिंदू होता ना. कोणत्या काळात जगतोय आपण, असा सवालही राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला.
Join Our WhatsApp Community