केजरीवालांकडून काश्मिरी पंडितांची अवहेलना! का सुरु झाला #KejriwalAgainstHindus ट्विटर ट्रेंड

138

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधानसभेत द काश्मीर फाइल्स या चित्रपटाला टॅक्स फ्री करण्याच्या मागणीवरून भाजपवर सडकून टीका केली. त्यावेळी त्यांनी या चित्रपटात हाताळण्यात आलेला काश्मिरी पंडितांचा वंशविच्छेद या सारखा गंभीर विषय विनोदाचा बनवला. एकप्रकारे त्यांनी काश्मिरी पंडितांवरील अत्याचाराचा मुद्दा करमणुकीचा बनवला. त्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटले. त्यामुळे ट्विटरवर #KejriwalAgainstHindus हा ट्रेंड सुरु झाला असून त्या निमित्ताने केजरीवाल हिंदू विरोधी आहेत, याचे दाखले नेटकरी देऊ लागले आहेत.

काय म्हणाले होते केजरीवाल? 

संपूर्ण भारतीय जनता पार्टी देशभरात एका चित्रपटाचे पोस्टर लावत आहे. असे चित्रपटाचे पोस्टर लावण्यासाठी तुम्ही राजकारणात आले होते काय? तुमच्या मुलांना काय उत्तर द्याल घरी जाऊन? मुलं विचारतील बाबा काय काम करता? त्यांना सांगाल का चित्रपटाचे पोस्टर लावतो म्हणून. 8 वर्ष देश चालवल्यानंतर जर कुठल्या पंतप्रधानांना विवेक अग्निहोत्रीच्या पायाशी लोळण घ्यावे लागले, तर त्याचा अर्थ होतो की 8 वर्षे त्या पंतप्रधानांनी काहीही काम केलेलं नाही. 8 वर्षे खराब केले. विवेक अग्निहोत्रीच्या पायाशी त्यांना लोळण घ्यावे लागत आहे की वाचव वाचव वाचव म्हणून…अशा शब्दात अरविंद केरजीवाल यांनी द काश्मीर फाईल्सच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

(हेही वाचा हिजाब वाद: विरारच्या लॉ कॉलेजच्या प्राध्यापिकेला न्यायालयाचा निर्णय मान्य नाही?)

काय म्हणतात नेटकरी? 

स्नेहा वेमुलकर म्हणतात की, कल्पना करा की तुमच्या नातेवाईकांची हत्या झाली, बलात्कार झाला आणि नंतर तुम्हाला अनेक दशके तुमच्या घरातून हद्दपार केले गेले. आणि मग एका निवडून आलेला मुख्यमंत्री या अत्याचारांवर हसतो, तो अत्याचार खोटा ठरवतो, हे तुम्हाला पहावे लागते, हे दुर्दैव आहे.

तर अग्निवेश कुमार म्हणाले, अरविंद केजरीवाल यांनी सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून आपल्या जवानांच्या बलिदानावर आणि शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. केजरीवाल यांनी बाटला हाऊसमध्ये दहशतवाद्यांच्या चकमकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आता ते काश्मीरमधील हिंदूंच्या अत्याचाराची थट्टा करत आहेत.

अभिनव प्रकाश म्हणाले, काश्मिरी हिंदूंच्या दुरवस्थेची थट्टा करून, काश्मिरी पंडितांच्या वांशिक अत्याचाराला ‘प्रचार’ म्हणत केजरीवाल इस्लामी संघटनांची भाषा बोलत आहेत. त्याने आपली बाजू निवडली आहे.

https://twitter.com/Abhina_Prakash/status/1507910897746210818?s=20&t=qiWSLpDnT2rE226eaTMDXg

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.