सध्या देशभरात द कश्मीर फाईल्स या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 1990 मध्ये काश्मिरी पंडितांच्या झालेल्या नरसंहाराची सत्यकथा सांगणारा हा चित्रपट आहे. सर्वत्र या चित्रपटाला पसंती मिळत असताना, काॅंग्रेसने मात्र एक वादग्रस्त ट्वीट करत, काश्मिरी पंडींतांच्या नरसंहारावर बोलण्याऐवजी मुसलमानांचीच हत्या अधिक झाल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे काॅंग्रेसला मुसलमानांचाच पुळका असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
काॅंग्रेसचं ट्वीट
काश्मिरी पंडितांना निशाना बनवणारे दहशतवादी होते. 1990 ते 2007 या 17 वर्षाच्या काळात दहशतवादी हल्ल्यात 399 पंडितांची हत्या झाली. याच काळात दहशतवाद्यांनी 15 हजार मुस्लिमांची हत्या केली होती. काश्मीर खोऱ्यातून काश्मीर पंडितांचं पलायन तत्कालीन राज्यपाल जगमोहन यांच्या निर्देशावर झाले होते. ते आरएसएस विचारसरणीचे होते असंही काँग्रेसनं म्हटलं आहे.
( हेही वाचा राज्यातील या भागात द्राक्ष बागा झाल्या नष्ट, कारण… )
नंतर केलं ट्विट डिलीट
काँग्रेसकडून करण्यात आलेल्या ट्विटनंतर सोशल मीडियावर यूजर्सने काँग्रेसविरोधात प्रश्नांचा भडिमार लावला, तसेच त्यावरुन विविध प्रतिक्रिया दिल्या. त्यानंतर केरळ काँग्रेसनं हे ट्वीट डिलीट केले. या चित्रपटात 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा दाखवण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community