‘मला हिंदू म्हणा’, केरळचे राज्यपाल आरीफ मोहम्मद खान यांचं विधान

97

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी मल्याळी हिंदूंनी आयोजित केलेल्या हिंदू संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली. यावेळेस केलेल्या भाषणामध्ये त्यांनी मोदींवरील बीबीसीच्या डाॅक्युमेंट्रीवरुन टीकास्त्र सोडले. खान यांनी भारतासाठी अंधकारमय भविष्यवाणी करणारे त्रस्त असल्याने ते नकारात्मक प्रचार करत आहेत, अशी टीका केली आहे. ज्या लोकांनी भारतासाठी येणारा काळ अंधकारमय असेल असे सांगितले होते, ज्यांनी भारताचे शेकडो तुकडे होतील असे सांगितले होते, ते हैराण आहेत असेही म्हटले. याच कारणामुळे अशा पद्धतीचा नकारात्मक प्रचार करण्यासाठी ते अशा डाॅक्युमेंट्रीचा आधार घेत आहेत. ज्यावेळी इंग्रज भारतात आले होते त्यावेळी त्यांनी डाॅक्युमेंट्री का बनवली नव्हती? असा प्रश्न खान यांनी विचारला.

( हेही वाचा: तामिळनाडूत अखेर हिंदुत्ववादी संघटनेच्या सभेला उच्च न्यायालयाची परवानगी; सरकारने आधी नाकारलेली )

मला हिंदू म्हणा, हिंदू म्हणजे….

याचबरोबर केरळचे राज्यपाल असलेल्या खान यांनी या कार्यक्रमामध्ये उपलब्ध असलेल्या लोकांनी आपल्याला हिंदू म्हणावे, असेही म्हटले. हिंदू हा धार्मिक शब्द नाही तर एका विशेष भौगोलिक क्षेत्रामध्ये जन्माला आलेल्या लोकांसाठी तो वापरला जातो, असा युक्तीवाद खान यांनी केला. तुम्ही मला हिंदू का नाही? म्हणत मी हिंदू हा शब्द धार्मिक असल्याचे मानत नाही. हिंदू एक भौगोलिक शब्द आहे. जो कोणी भारतामध्ये जन्माला आला आहे. अगदी कोणीही जो इथे राहतो किंवा भारतामध्ये अन्नग्रहण करतो, जो कोणी भारतामधील नद्यांचे पाणी पितो त्याला स्वत: ला हिंदू म्हणण्याचा अधिकार आहे, असे खान यांनी भाषणादरम्यान म्हटले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.