केरळचे नाव बदलून (Kerala Name Change) ते ‘केरळम्’ करण्याची विनंती केंद्र सरकारला करण्याचा ठराव मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी बुधवारी विधानसभेत मांडला. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या ठरावाच्या माध्यमातून राज्यघटना आणि अन्य सरकारी कागदपत्रांमध्ये हा बदल करण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली आहे.
(हेही वाचा – No-Confidence Motion : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अविश्वास प्रस्तावाला उत्तर देणार)
मल्याळी भाषेत आमच्या राज्याचे नाव ‘केरळम्’ (Kerala Name Change) आहे. भाषानिहाय प्रांतानुसार राज्याची स्थापना १ नोव्हेंबर १९५६ मध्ये झाली होती. त्याच दिवशी ‘केरळ दिन’ साजरा होतो. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या काळापासूनच मल्याळी भाषिक समुदायांना केरळसाठी एकत्र येण्याची गरज वाटत होती. मात्र राज्यघटनेची पहिल्या अनुच्छेदात राज्याचे ‘केरळ’ असे नाव नोंदण्यात आले, असे ठरावात म्हटले आहे.
राज्यघटनेचे कलम ३ अंतर्गत राज्याच्या नावात ‘केरळ’ (Kerala Name Change) ऐवजी ‘केरळम्’ अशी दुरुस्ती करण्याची एकमुखी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. राज्यघटनेच्या आठव्या अनुच्छेदात नमूद केलेल्या सर्व भाषांमध्ये आमच्या राज्याचे ‘केरळम्’ असे नामकरण करावे, अशी विनंतीही सभागृहाने केली आहे. विशेष म्हणजे हा प्रस्ताव विधानसभेने एकमताने मंजूर केला आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने त्याला विरोध केला नाही. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटने (यूडीएफ) त्यात कोणतीही दुरुस्ती सुचवली नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community