धक्कादायक! लखीमपूरमध्येही खलिस्तान्यांचा सहभाग?

काही आंदोलकांनी जर्नेलसिंग भिंडरावालाचा फोटो असलेले टी-शर्ट घातलेले होते. त्यामुळे यामागे खलिस्तानी यांचा सहभाग होता का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

दिल्लीच्या सीमांवर किसान युनियनच्या माध्यमातून जे शेतकरी आंदोलन सुरु आहे, त्यामध्ये खलिस्तानी यांचा समावेश असल्याचे पुरावे मिळाले होते, तसेच २६ जानेवारी रोजीच्या वेळी दिल्लीच्या लाल किल्ल्याकडे हिंसक आंदोलन करण्यात आले होते. त्यामागे खलिस्तानी दहशतवाद्यांचा यांचा हात होता, असे समोर आले होते, आता लखीमपूर येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे आणि हिंसाचाराचे फोटो समोर आले आहेत. त्यामध्ये काही आंदोलकांनी जर्नेलसिंग भिंडरावालाचा फोटो असलेले टी-शर्ट घातलेले दिसत आहेत. त्यामुळे यामागेही खलिस्तानी यांचा सहभाग होता का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात मृत्यू झालेल्या ९ लोकांमध्ये ४ शेतकरी, ४ भाजप कार्यकर्ते आणि १ पत्रकार आहे. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्या कारने चिरडून मृत्यू झाल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. मंत्री आणि खासदार मिश्रा यांनी या आरोपांचे खंडन केले असून, आंदोलकांवर भाजप कार्यकर्त्यांची हत्या केल्याचा आरोप करत आहेत.

मोठे षडयंत्र असल्याचा संशय!

लखीमपूर खीरीमध्ये शेतकरी आणि भाजप नेते यांच्यात झालेल्या संघर्षात ९ जणांचा मृत्यू झाला. या घटनेचे आता बरेच व्हिडिओ आणि छायाचित्रे समोर येऊ लागली आहेत. तसेच सोशल मीडियातही व्ह्यायरल होताना दिसत आहेत. या गर्दीतील काही आंदोलक जर्नेलसिंग भिंडरावालाचा फोटो असलेले टी-शर्ट घातलेले दिसत आहेत. तसेच, त्यांच्या हातात काठ्या असून, वाहनांवर हल्ला करतानाही दिसत आहेत. यावरून हा मोठा कट असल्याचा संशय व्यक्त होत आहे. भिंडरावालाचा शेतकऱ्यांशी काहीही संबंध नाही, पण त्याचा टी-शर्ट घातलेले अनेक लोक दिसत आहेत. पोलिसही याबाबत काही सांगायला तयार नाहीत. यावरुन काहीतरी मोठे षड्यंत्र असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. जर्नेलसिंग भिंडरावाला याचे खरे नाव जर्नेलसिंग ब्रार होते. खलिस्तानची मागणी करणाऱ्या शिखांचा तो प्रमुख नेता होता. अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात भारतीय सैन्याशी झालेल्या चकमकीत त्याचा मृत्यू झाला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here