कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तान्यांच्या (Khalistani) मर्जीसाठी भारतावर गंभीर आरोप केले, ज्यामुळे भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध ताणले आहेत. कॅनडातील पंतप्रधानाचा मिळत असलेला पाठिंबा पाहून आता कॅनडातील खलिस्तान्यांचे अवसान चांगलेच वाढले आहे. भारताचे तुकडे करण्याचा मनसुबा बाळगून असलेले खलिस्तानी आता कॅनडातील भारतीय वंशातील नागरिकांना टार्गेट करू लागले आहेत. विशेष म्हणजे गुजराती भाषिकांना लक्ष्य करत आहेत. त्यांना जीवे मारण्याची धमकी देत आहेत.
सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये खलिस्तानी (Khalistani दहशतवादी खांद्यावर खलिस्तानी झेंडा घेऊन तेथील गुजराती भाषिक नागरिकांना धमकावत आहेत. तुमची हाडे मोडून काढू, कॅनडात जर का इथे मारामारी सुरु झाली तर तुमच्या गुजरामध्येही मारामारी करू, तुमच्या घरात घुसून मारू. तुम्हाला काय करायचे ते करा, अशी धमकी देताना दिसत आहेत. त्यामुळे खलिस्तानी आता कॅनडात भारतीय नागरिकांना टार्गेट करू लागले आहेत. जर तिथे त्यांना संरक्षण दिले नाही तर मात्र भारतीय नागरिकांचे जीवन संकटात आहे, असे संकेत या व्हिडिओमधून मिळत आहे.
(हेही वाचा MLA Disqualification : आमदार अपात्रतेसंबंधी 13 ऑक्टोबरला होणार सुनावणी)
Join Our WhatsApp Community