पंजाबमध्ये देशातील पहिल्या मुस्लिमबहुल मलेरकोटला जिल्ह्यात फडकला खलिस्तानी झेंडा

86
देशात जिथे जिथे मुसलमानांची लोकसंख्या वाढते, तिथे मुसलमान स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व दाखवतात. नंतर तो भाग मुसलमान अप्रत्यक्षपणे स्वतःची मालमत्ता समजू लागतात. थोडक्यात तिथे अन्य धर्मियांना दुसरा दर्जा दिला जातो, मग तो मुंबईतील मुंब्रा, भेंडी बाजार यांसारखे मोहल्ले असो कि काश्मीर, पश्चिम बंगाल यांसारखी राज्ये असो. त्या त्या भागातील राज्यकर्त्यांनी मुसलमानांच्या एकगठ्ठा मतांसाठी मुसलमानांच्या अशा विघटनवादी विचारांना प्रोत्साहन दिले. काँग्रेसने याची पंजाबमध्ये पुनरावृत्ती केली. ईदच्या निमिताने औचित्य साधून काँग्रेसने 2020 मध्ये पंजाबमध्ये काँग्रेस सरकारने मुस्लिमांचे तुष्टीकरण करण्यासाठी पंजाबमध्ये मलेरकोटला भाग मुस्लिमबहुल बनल्याने तेथील जनतेच्या मागणीनुसार खास मुस्लिमांसाठी देशातील पहिला मुस्लिम बहुल जिल्हा बनवला. त्याचे परिणाम म्हणून 29 एप्रिल 2022 च्या पहाटे मलेरकोटला येथील पोलीस उपायुक्त कार्यालयाबाहेर खलिस्तानी ध्वज फडकवण्यात आला. सोशल मीडियावर जेव्हा हा व्हिडिओ झळकला तेव्हा देशभर खळबळ माजली. विशेष म्हणजे या देशद्रोही कृत्याची जबाबदारी खलिस्तानी दहशतवादी संघटनेचा म्होरक्या गुरपतवंत सिंग पन्नू याने घेतली आहे.

काय म्हणतो गुरपतवंत पन्नू?

खलिस्तान दिनानिमित्त आम्ही मलेरकोटला येथील उपायुक्त कार्यालयावर खलिस्तानी ध्वज फडकावला. भगवंत मान यांच्या सरकारला हा संदेश आहे. पंजाबला भारतातून मुक्त करण्यासाठी खलिस्तानने दिलेली मुदत संपत आहे. यमुनेच्या पलीकडे जाण्यासाठी स्वतःला तयार करा.
खलिस्तानच्या दुसऱ्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, आज जगभरात ‘हरियाणा बनेगा खलिस्तान’ची चळवळ सुरू झाली आहे. हरियाणा आणि हिमाचल हे 1966 पर्यंत पंजाबचे भाग होते. चळवळीसाठी वेबसाइट सुरू करण्यात आली आहे. आम्ही पंजाबची एक इंचही जमीन सोडणार नाही.’ विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये खलिस्तान समर्थक आणि अभिनेता दीप सिद्धूचा फोटो वापरण्यात आला होता, ज्याचा काही महिन्यांपूर्वी रस्ता अपघातात मृत्यू झाला होता.

शिख फॉर जस्टिस याआधीचे झेंडा फडकवण्याचे केलेले आवाहन

15 एप्रिल रोजी, शिख फॉर जस्टिस या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचे गुरपतवंत सिंग पन्नू याने हरियाणातील डीसी कार्यालयाबाहेर ध्वज फडकावण्याचे आवाहन केले होते. खलिस्तानी झेंडे फडकवण्याच्या आवाहनासह त्याने “हरियाणा बनेगा खलिस्तान” चळवळ सुरू केली होती. एसएफजे 29 एप्रिल रोजी ‘हरियाणा बनायगा खलिस्तान’ मोहीम सुरू करेल जे स्वयंसेवकांची भरती करेल त्यानंतर खलिस्तान सार्वमताद्वारे हरियाणाला भारतीय कब्जातून मुक्त करण्यासाठी वकिली करतील.

पोलिसांसाठी धोक्याचा इशारा

पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत कार्यालयातील झेंडा आणि बॅनर हटवले. या प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी हे गैरकृत्य करण्यात आले. आम्ही हे गांभीर्याने घेत आहोत. कृत्याला अधिकारी चिकटून आहेत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी या प्रकरणाचा तपास करत आहेत, असे पोलिसांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.