खानापूर नगर पंचायत: पडळकरांच्या होमग्राऊंडवर भाजपचा भोपळाही फुटला नाही!

143

एसटी कर्मचाऱ्यांचा संप, बैलगाडा शर्यत असो किंवा एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न असो या सर्वच प्रश्नावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळतर यांनी आक्रमक भूमिका घेत ठाकरे सरकारवर नेहमीच निशाणा साधला. त्यामुळे पडळकरांनी कमी कालावधीत जनतेच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. मात्र नगर पंचायत निवडणुकीत पडळकरांना आपलं गोमग्राऊंड राखता आलेलं नाही. सांगली जिल्ह्यातील खानापूर नगरपंचायतीत भाजपचा दारून पराभव झाला आहे.

पडळकरांच्या पराभवाची चर्चा

पडळकरांच्या नेतृत्वात लढलेल्या या निवडणुकीत भाजपला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे भाजप नेते जरी संपूर्ण निकालावरुन राज्यात विजयाचा दावा करत असले, तरी सांगलीत पडळकरांच्या पराभवाची चर्चा मात्र सुरु आहे. खानापूर नगर पंचायत निवडणुकीत शिवसेना-काँग्रेसला 9 तर विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित जनता आघाडीला 7 जागा मिळाल्या आहेत. तर एक अपक्ष उमेदवार निवडून आलाय. मात्र, भाजपला याठिकाणी एकही जागा जिंकता आली नाही.

(हेही वाचा – दिलासा! पन्नासहजारांपेक्षा जास्त रुग्णांनी एका दिवसांत केली कोरोनावर मात)

जबाबदारी पार पाडण्यात भाजप निराशा

भाजपनं पहिल्यांदाच स्थानिक निवडणुकांची जबाबदारी गोपीचंद पडळकरांना सोपवली होती. मात्र भाजपची निराशा झाल्याची चर्चा आता सुरू आहे. खानापूरच्या एकूण 17 जागांसाठी शिवसेना-काँग्रेसनं आघाडी केली होती. राष्ट्रवादी पुरस्कृत जनता आघाडी स्वतंत्र लढली आणि भाजपनंही स्वतंत्र उमेदवार उभे केले. शिवसेना-काँग्रेस आघाडीचं नेतृत्व आमदार अनिल बाबरांनी केलं, तर राष्ट्रवादी पुरस्कृत जनता आघाडीचे नेतृत्व माजी आमदार सदाशिव पाटलांकडे होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.