क्रूझ ड्रग्ज पार्टीचे  मास्टरमाईंड  गोसावी, पाटीलच! सॅम डिसूझाची जबानी 

83

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात सॅम डिसुझा आणि मोहित कंबोज यांच्या आरोपांच्या फेऱ्यात अडकलेल्या सुनील पाटील याने अखेर मुंबई गाठून अनेक गौप्यस्फोट केले. या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसून, मनीष भानुशाली, किरण गोसावी आणि सॅम डिसुझा हेच या प्रकरणाचे मास्टरमाईंड असल्याचा दावा पाटील याने माध्यमांसमोर केला आहे. आपण फक्त यामध्ये ५० लाखांची डील केली होती, असेही त्यांनी नमूद केले होते. मात्र सॅम डिसूझा याने सोमवारी मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाला दिलेल्या जबानीत या प्रकरणाचे खरे मास्टर माईंड हे किरण गोसावी आणि सुनील पाटील हे दोघेच असल्याचे म्हटले आहे.

काय म्हणाला सॅम डिसूझा? 

माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. मी अभिनेता शाहरुख खान याची मॅनेजर पूजा ददलानी हिच्याकडून गोसावीने घेतलेले ५० लाख रुपये परत करण्यासाठी मदत केली. इतकाच आपला या प्रकरणाशी संबंध आहे. गोसावीला आपण ओळखत नव्हतो, सुनील पाटीलकडून मला त्याचा नंबर मिळाला, तेव्हा आपण गोसावीचा नंबर एनसीबीला पाठवला. आपण फक्त पाटीललाच ओळखत होतो. त्यानेच आपल्याला फोन करून क्रूझ पार्टीची माहिती दिली होती. तसेच पाटीलनेच मला एनसीबीशी संपर्क साधण्यास सांगितले होते. याविषयीचे आपल्याकडे पुरावेदेखील आहेत, असा दावा सॅम डिसुझा याने केला आहे.

(हेही वाचा : मुंबईकरांना धक्का! मेट्रो कारशेड रखडणार! काय म्हणाले उच्च न्यायालय?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.