मराठी नाट्यसंस्कृतीत समाजातील एकाच जातीचे प्राबल्य अधिक आहे. त्यामध्ये ब्राह्मणांची एकाधिकारशाही सुरु आहे, या क्षेत्रापासून अन्य जातीचे लोक दूर आहेत, अशा आशयाचा दावा अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांनी एका मुलाखतीत केला आहे. आद्य नाटककार महात्मा फुले असताना जाणीवपूर्वक विष्णुदास भावे यांचे नाव पुढे करण्यात आले, असेही कुलकर्णी म्हणाल्या आहे. त्यांची मुलाखत पोस्ट करत अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी मराठी नाट्य संस्कृतीवर जात्यंधतेचा आरोप केला आहे. यावर नेटकऱ्यांनी माने (Kiran Mane) यांना चांगलेच झोडपले.
…महात्मा फुलेंनी या मातीत पाया घातलेले ‘मराठी नाटक’ बहुजनांपासुन कुणी हिरावून घेतले?
“नाटक हे मराठी माणसाच्या संस्कृतीचा वगैरे भाग आहे“ ही निव्वळ थाप आहे !
महाराष्ट्रातल्या ग्रामीण आणि निमशहरी भागात लोक नाटक बघत नाहीत. आजही तिथल्या लोकांना विचारा की “आत्ता व्यावसायिक… pic.twitter.com/XZKrvDDE9f
— Kiran Mane (@kiranmane7777) April 7, 2025
किरण माने यांनी काय म्हटले?
किरण माने (Kiran Mane) यांनी त्यांची पोस्ट X वर पोस्ट करत म्हटले की, महात्मा फुलेंनी या मातीत पाया घातलेले ‘मराठी नाटक’ बहुजनांपासुन कुणी हिरावून घेतले? “नाटक हे मराठी माणसाच्या संस्कृतीचा वगैरे भाग आहे“ ही निव्वळ थाप आहे! महाराष्ट्रातल्या ग्रामीण आणि निमशहरी भागात लोक नाटक बघत नाहीत. आजही तिथल्या लोकांना विचारा की “आत्ता व्यावसायिक रंगभूमीवर कुठली नाटकं सुरू आहेत?” त्यांना सांगता येणार नाही…फक्त २% लोक मराठी व्यावसायिक नाटक पाहतात. गीतांजली कुलकर्णी अगदी परखड सत्य बोलली आहे ! खुप जणांना हे टोचेल, पण कटू असले तरी वास्तव नाकारून कसे चालेल? मराठीमधले पहिले नाटक १८५० साली महात्मा फुले यांनी लिहिले होते…ते नाकारून विष्णुदास भावेंना उगाचच ‘नाटकाचे उद्गाते’ वगैरे ठरवले ! पायाच खोटा घातल्यामुळं बहुजन वर्ग नाटकापासून दूर गेला. आमच्या क्षेत्रात क्वचित असं कुणी निर्भीड सत्य मांडतं तेव्हा ‘माझिया जातीचे’ भेटल्याचा आनंद होतो.
(हेही वाचा Waqf Amendment Bill : वक्फ कायद्यावरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गोंधळ)
नेटकऱ्यांनी दाखवला आरसा
राहुल रेवाळे यांनी आद्य नाटकाकर विष्णुदास भावे असल्याचे सांगत, ‘फक्त एक दुरुस्ती विष्णुदास भावेंचे नाटक 1843 ला आले होते आणि महात्मा फुल्यांचे तृतीय रत्न हे 1855 साली. त्यामुळे भावेंना जनक मानणे फारसे चूक नाही.’ असे म्हटले.
फक्त एक दुरुस्ती विष्णुदास भावेंचे नाटक 1843 ला आले होते आणि महात्मा फुल्यांचे तृतीय रत्न हे 1855 साली. त्यामुळे भावेंना जनक मानणे फारसे चूक नाही.
— Rahul Revale (@drrahulrevale) April 7, 2025
तर महेश विचारे म्हणतात, ‘कसला डोंबलाचा खोटा पाया. विष्णुदास भावे हे नाटककार आहेत की नाहीत हे सांगा. महात्मा फुले हे नाटककार आहेत की नाही हे सांगा. भावेंनी १८४३मध्ये सीता स्वयंवर हे नाटक सादर केले. त्यांची पूर्ण कारकीर्द नाट्यक्षेत्रातील आहे. मग ते नाटककार की महात्मा फुले नाटककार?’
कसला डोंबलाचा खोटा पाया. विष्णुदास भावे हे नाटककार आहेत की नाहीत हे सांगा. महात्मा फुले हे नाटककार आहेत की नाही हे सांगा. भावेंनी १८४३मध्ये सीता स्वयंवर हे नाटक सादर केले. त्यांची पूर्ण कारकीर्द नाट्यक्षेत्रातील आहे. मग ते नाटककार की महात्मा फुले नाटककार?
— mahesh vichare (@mvichareMT) April 7, 2025
मकरंद बाळ म्हणाले, ‘अहो ती कुलकर्णी ब्राह्मण आहे..चुकून तिचे कौतुक करताय की काय? असं ब्राह्मणांना चांगलं म्हणत गेलात तर तुमचा डोलारा जो ब्राह्मण द्वेषावर उभा आहे तो कोसळेल ना’
अहो ती कुलकर्णी ब्राह्मण आहे..चुकुन तीचं कौतुक करताय की काय? असं ब्राह्मणांना चांगलं म्हणत गेलात तर तुमचा डोलारा जो ब्राह्मण द्वेषावर उभा आहे तो कोसळेल ना
— Makarand Bal (@MakarandBa51477) April 7, 2025
Join Our WhatsApp Community