उबाठा आणि जीव्हीकेवर Kiran Pavaskar यांनी केला खळबळजनक आरोप; म्हणाले…

220
उबाठा आणि जीव्हीकेवर Kiran Pavaskar यांनी केला खळबळजनक आरोप; म्हणाले...
  • प्रतिनिधी

मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यासाठी उबाठा आणि जीव्हीकेमध्ये डील झाल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे प्रवक्ते किरण पावसकर (Kiran Pavaskar) यांनी पत्रकार परिषदेत केला.

(हेही वाचा – लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची नाराजी भोवली; Ajit Pawar यांची स्पष्टोक्ती)

किरण पावसकर (Kiran Pavaskar) म्हणाले, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव हे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे दिले गेले. मुंबई विमानतळाचे विस्तारीकरण करण्यासाठी जीव्हीके कंपनीने सहार पोलिस स्टेशन आणि महाराजांचा अश्वारुढ पुतळा हलवण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र याला बाळासाहेबांनी पहिला विरोध केला होता. याविषयी कंपनीशी डील करण्यासाठी उद्धव ठाकरे गेले होते. छत्रपतींच्या नावाने तुम्ही किंमत विचारायला गेला होतात आणि ती किंमत तुम्ही घेतली, असाआरोप पावसकर यांनी यावेळी केला.

(हेही वाचा – जातीनिहाय जनगणनेबाबत काय आहे RSS ची भूमिका?)

मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत झालेला प्रकार दुर्देवी आहे. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी माफी मागितली, मात्र त्यावर उबाठाकडून सुरु असलेले राजकारण निंदनीय आहे, अशी टीका पावसकर (Kiran Pavaskar) यांनी केली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.