मालेगाव प्रकरणी Kirit Somaiya आक्रमक; ‘बोगस जन्म दाखले घेणाऱ्या 110 जणांची यादी पोलिसांना दिली’

97

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील काही हजारो बांगलादेशी (Malegaon Bangladeshi case) आणि रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र (Malegaon bogus birth certificate) दिले आहे. त्यामुळे भाजपा नेते किरीट साेमय्या आक्रमक झाले आहेत. दरम्यान या प्रकरणात तहसीलदार जबाबदार आहेत. त्यांच्यावर आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या राजकीय लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा (Crime of treason) दाखल करावा, अशी मागणी किरीट साेमय्या यांनी केली. (Kirit Somaiya)

मालेगावात घुसखाेर बांगलादेशी, राेहिंग्या (किरीट सोमय्या) यांनी जन्माचा दाखला मिळवण्यासाठी खाेटी कागदपत्रे सादर केली आहेत, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या वारंवार करत आहेत. त्यांनी शुक्रवारी बनवेगिरी करून दाखले घेणाऱ्या ११० जणांची यादी छावणी पाेलिसांकडे दिली. सरकारी यंत्रणेची फसवणूक करणाऱ्या या घुसखाेरांवर गुन्हे दाखल करावेत, असा तक्रार अर्जही दिला आहे. या घाेटाळ्यात महसूल अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याने तहसीलदारांना रजेवर पाठवावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे साेमय्या यांनी सांगितले. दरम्यान, साेमय्या यांनी केवळ बाेगस कागदपत्रांचे पुरावे सादर केले, पण घुसखाेर असल्याचा कुठलाही पुरावा दिला नाही.

(हेही वाचा – Mahakumbh 2025 : महाकुंभात स्फोटाची धमकी; 18 संशयित ताब्यात, संरक्षण मंत्री लष्कराच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार)

जन्म प्रमाणपत्र वितरण घाेटाळ्याचा आराेप करणारे साेमय्या शुक्रवारी (१७ जानेवारी) चाैथ्यांदा मालेगावी आले हाेते. त्यांनी तहसील कार्यालयात महसूल व पाेलिस अधिकाऱ्यांशी तासभर या घाेटाळ्याशी निगडित मुद्द्यांवर चर्चा केली. यानंतर छावणी पाेलिस ठाण्यात जाऊन तक्रार अर्ज दिला.

(हेही वाचा – NCP Politics : राष्ट्रवादीच्या नवसंकल्प शिबिराला ‘लिमिटेड’ पदाधिकाऱ्यांना निमंत्रण; विदर्भातील नाराजी उफाळली)

आतंकी संघटनेच्या नेेत्याचे पाठबळ असल्याचा दावा

घुसखाेरांना एका आतंकी संघटनेचा (terrorist organization) नेता व बांगलादेश – प. बंगाल सीमेवरील दलालाचे पाठबळ आहे, असे सांगत माझी मोहीम व्हाेट जिहाद समर्थकांना खुपत असणारच अशी टीकाही सोमय्यांनी खासदार डाॅ. शाेभा बच्छाव यांच्यावर केली.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.