22 आरोप केले एकही सिद्ध झाला नाही, संजय राऊत का हिसाब होगा; सोमय्यांचा इशारा

133

मागच्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरु आहे. शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधताना किरीट सोमय्या म्हणाले की, 28 नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. शपथ घेतल्यावर, अजमेरा बिल्डरची जमीन 900 कोटीत सरकारने विकत घेतली. रोज सकाळी उठल्यावर कोंबडा आरवतो. तसा उद्धव ठाकरेंचा प्रवक्ता, भोंगा बोलत असतो. त्यांनी माझ्यावर आतापर्यंत 22 आरोप केले, एकही सिद्ध होत नाही, इसकाभी हिसाब होगा, असे म्हणत सोमय्यांनी राऊतांना इशारा दिला आहे.

संजय पांडेंनाही इशारा

अडीच लाख लोकांचे भवितव्य अडकून पडले आहे, वसूलीची भूक आहे, रात्री हिशेब घेऊन ये, नोटा मोजायची मशीन साफ करुन ठेवतो. पालक आणि बालकाचं काय त्यांच झालं की मातोश्रीचे काय सरकार हिशोबावर चालते, वसूली सरकार आहे. वसूली विरोधात आवाज उठवला की काय होते इथला कमिश्नर माफिया संजय पांडे नसल्यामुळे इथे पोलीस बंदोबस्त चांगला आहे. त्यामुळे मी इथल्या पोलिसांचे मी आभार मानतो. खार पोलीस स्टेशनचे उदाहरण आपण पाहिले. संजय पांडेंना लाज वाटत नाही, ज्य कमांडोमुळे किरीट सोमय्या वाचला त्या कमांडोच्या ड्रायव्हरवर केस टाकली. त्यामुळे मी संजय पांडेंना सोडणार नाही. संजय राऊत आणि संजय पांडे यांचाही हिशोब होणार असे सोमय्या यावेळी म्हणाले.

( हेही वाचा: आरोग्य विभागात 10 हजार पदांची भरती )

पोलीस ठाकरे परिवाराचे नाहीत

आता मला ट्विटरवरुन धमकी आली आहे. उल्हासनगरला या, खारपेक्षा चांगली व्यवस्था करु. याची पोलिसांनी नोंद घ्यावी. ट्विटरवर मला आज धमकी आली. त्याचे तुम्ही काय केले? तुमची जबाबदारी आहे. 24 तासांत धमकी देणा-यांवर कारवाई करा, आपण महाराष्ट्राचे पोलीस आहात. ठाकरे परिवाराचे नाही, अशी टीकाही सोमय्यांनी यावेळी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.