राऊतांचा बोलविता धनी उद्धव ठाकरे, सोमय्यांचा हल्लाबोल!

120

संजय राऊत आणि किरिट सोमय्या यांच्यात मागच्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरु आहे. आता यातच पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत, किरिट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर आरोपांची सरबत्ती केली आहे. काही पत्र वाचून दाखवत, पुन्हा एकदा सोमय्या यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. तसेच, संजय राऊतांचा बोलविता धनी उद्धव ठाकरे असल्याचा घणाघातही सोमय्यांनीही केला होता.

शिवराळ भाषेवरुन संताप

कोर्लई गावातील 19 बंगल्यांवर उद्धव ठाकरे काहीच का बोलत नाही? शिवसेनेच्या कोणत्याच नेत्यामध्ये या प्रकरणावर बोलण्याची हिंमत नाही, असं सोमय्या म्हणाले. तसंच राऊतांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांवरदेखील त्यांनी संताप व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ त्यांना कळतो का? ते उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या मार्फत ही शिवीगाळ करत असल्याचा आरोपही सोमय्यांनी यावेळी केला.

मृत्यूला जबाबदार कोण

कोविड काळात लाईफ लाईन मॅनेजमेंट या ब्लॅकलिस्ट कंपनीमुळे १५ दिवसांत ज्या लोकांचे जीव गेले, त्याला जबाबदार कोण असं सोमय्या म्हणाले. इंटरनल हेल्थ केअर ही कंपनी देखील अशीच असल्याचा आरोप सोमय्यांनी केला. या कंपन्यांना काम दिलं आणि एम.डी.च्या जागेवर कंपाऊंडर उभे केले अन् लोकांचे जीव गेले असं सोमय्या म्हणाले.

( हेही वाचा: IIT च्या विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल! “माय लास्ट…” असं स्टेटस ठेवलं अन् )

नुसत्या वाफा, पुरावा नाही

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.