ख-या घोटाळेबाजांवर आता कारवाई केली जाणार आहे. भाजपचे नेते आता अॅक्टीव्ह मोडवर असून कोणत्याही क्षणी ठाकरे सरकारच्या घोटाळ्यांची लंका जळू शकते. याची त्यांना भीती वाटत आहे. असं वक्तव्य भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले आहे. भाजपच्या महाराष्ट्र दिनी झालेल्या बुस्टर सभेनंतर आता भाजपचे सगळे नेते अॅक्टीव झाल्याचे किरीट सोमय्या यावेळी म्हणाले. तसेच, आता घोटाळेबाजांवर कारवाई होणार असल्याचा इशारा सोमय्यांनी दिला आहे.
मुख्यमंत्र्यांना भीती घोटाळे उघड होतील
उद्धव ठाकरेंना प्रत्येकवेळी असं वाटतं की, त्यांच्या घोटाळाच्या लंकेत हनुमान स्वत: येऊन आग लावणार आहेत. ठाकरे सरकारला भीती वाटणे ही स्वाभाविकच आहे. मंत्री जेलमध्ये आहेत. अनेक मंत्री बेलवर आहेत. ठाकरे परिवाराची बेनामी संपत्ती आता जप्त व्हायला लागली आहे. त्यामुळे त्यांची अस्वस्थता दिसत आहे. कोणत्याही क्षणी उद्धव ठाकरेंच्या घोटाळ्याची लंका जळू शकते, अशी भीती त्यांना असल्याचे सोमय्या म्हणाले.
( हेही वाचा: राज्यात दोन महिन्यांत उष्माघाताने २५ मृत्यू; केंद्राचे राज्यांना पत्र )
आता पर्यावरण प्रेम कुठे गेले?
आदित्य ठाकरे फक्त मुंबई मेट्रोची वाट लावण्यासाठी बसले आहेत. पर्यावरणाची काळजी करत होते, ठाकरे यांना आणि त्यांच्या माफिया पोलिसांना पहाटे चार वाजता आणि पाच वाजता जे भोंगे वाजतात ते ऐकायला येत नाहीत का? त्यांना का 7 आधी लाऊड स्पीकर लावण्यास परवानगी नाही. 10 नंतर गणेशोत्सवात लाऊड स्पीकर बंद केले जातात आणि मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे किती डेसिबल आवाज झाला याचे माप घेण्यासाठी मशीन घेऊन फिरतात, तर तुम्हाला त्या मशिदींवरील भोंग्यांचे डेसिबल ऐकू येत नाहीत? भारतीय जनता पक्षाचे स्पष्ट म्हणणं आहे ध्वनी प्रदूषण चालणार नाही, मग ते मंदिर असो, मस्जिद असो किंवा आणखीन काहीही असो. विनापरवानगी लावण्यात आलेले लाऊड स्पीकर बंद व्हायलाच हवे.
Join Our WhatsApp Community