किरीट सोमय्या म्हणतात, संजय राऊतांची भाषा बदलली

201

मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. आधीच मंत्री नवाब मलिक हे ईडीच्या कोठडीत बंद आहेत. त्यामुळे सध्या महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांचे धाबे दणाणले आहेत. या अशा परिस्थितीत सर्वांचे लक्ष हे शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडे लागले आहे. यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी खोचक टीका केली.

डर्टी डझनची आठवण करून दिली

या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, ‘गेले ४ दिवस शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांची भाषा बदलली आहे. कारण मी समजू शकतो, डर्टी डझनवर कारवाई होणारच…’. कालपर्यंत शिवसेना नेते संजय राऊत हे कायम भाजपच्या विरोधात बोलत असतात, भाजपच्या नेत्यांवरही कारवाई करण्यात येईल, असे म्हटले होते. मात्र किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील मंत्री आणि नेते त्यांच्या 12 जणांची यादी जाहीर केली. त्याला त्यांनी डर्टी डझन नावाने यादी बनवली आहे. त्याची आठवण करून देत सोमय्या यांनी ट्वीट करून गेले ४ दिवस शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांची भाषा बदलली आहे, असे म्हटले आहे.

(हेही वाचा ‘भगवंता’ काय केलंस? शपथविधीसाठी ‘आम आदमीचं’च शेत तुडवलंस?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.