घाटकोपर येथील होर्डिंगच्या दुर्घटनेत (Ghatkopar Hoarding accident) मृतांच्या आकड्यांची संख्या १४ पर्यंत पोहचली आहे. अजूनही होर्डिंग हटवण्याचे काम सुरु असून त्याखाली अनेक जण दबले असण्याची भीती अजूनही व्यक्त केली जात आहे. त्यातच भाजपाचे नेते किरीट सोमैया यांनी गंभीर आरोप केला आहे. या होर्डिंगमधून वर्षाला ५० कोटी मिळायचे, त्यातील किती टक्के हिस्सा मातोश्री आणि भांडुपला जायचा, हे सांगावे, असे सोमैया म्हणाले.
(हेही वाचा Narendra Modi: जिरेटोप प्रकरणाबाबत प्रफुल पटेल यांनी सोशल मीडियावर दिलं स्पष्टीकरण; म्हणाले…)
काय म्हणाले सोमैया?
घाटकोपर पेट्रोल पंपच्या जमिनीची जागा ही महाराष्ट्र सरकारच्या पोलीस हौसिंगची जागा आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये गैरकायदेशीररित्या उद्धव ठाकरे सरकारने या जागेवर पेट्रोल पंप LORD’S MARK INDUSTRIES LTD. या कंपनीला आणि या जागेवर होर्डिंग लावण्याचा कॉन्ट्रॅक्ट भावेश भिंडे यांच्या मे. इगो मेडीया प्रा. लि. कंपनीला दिला. पेट्रोल पंपाची वार्षिक कमाई ₹25 कोटी व होर्डिंगची वार्षिक कमाई ₹25 कोटी. भावेश भिंडेला आमदार सुनील राऊत हे उद्धव ठाकरे यांच्याकडे घेऊन गेले होते. संजय राऊत या 50 कोटींतून मातोश्रीला किती पैसे जातात आणि भांडूपला किती पैसे येतात, याचा हिशोब देणार का?, असे सोमैया म्हणाले. (Ghatkopar Hoarding accident)
Join Our WhatsApp Community