खार पोलीस ठाण्यात अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याना भेटण्यासाठी गेल्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या वाहनावर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. या प्रकरणी आता किरीट सोमय्या यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या हल्ल्याची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पोलीस चौकशीत हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप
या हल्ल्यात किरीट सोमय्या यांच्या गाडीच्या काचा फोडल्या होत्या, त्यावेळी सोमय्या यांच्या हनुवटीकडे रक्तस्त्राव होत होता. मात्र हा रक्तस्त्राव खोटा आहे, असा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी पोलिसांनी त्यांच्या एफआयआरमध्ये बदल केला आहे, असा आरोप करत सोमय्या यांनी त्यावर स्वाक्षरी न करता तो स्वीकारला नाही. तसेच आता सोमय्या यांनी या हल्ल्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यात सोमय्या यांनी पोलिसांनी जाणीवपूर्वक एफआयआरमध्ये फेरबदल केले आहेत. त्यात गुन्हे कमी तीव्रतेचे टाकले आहेत. पोलीस भेदभाव करत आहेत. या हल्ल्याप्रकरणी ८० शिवसैनिकांवर कारवाई करण्यात यावी. तसेच या हल्ल्याची चौकशी सीबीआयच्या मार्फत करण्यात यावी, अशी मागणी सोमय्या यांनी याचिकेत केली आहे. यामुळे आता न्यायालयात या याचिकेवर काय आदेश देते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
(हेही वाचा एसटी धावली, उत्पन्नात कोटीच्या घरात पोहचली!)
Join Our WhatsApp Community